Source: Sakal Kolhapur
99732कोल्हापूर : इंटेक्स्पो प्रदर्शनात आर्किटेक्ट शिरीष बेरी यांना ‘आयकॉन ऑफ कोल्हापूर’ मानपत्र प्रदान करताना उपस्थित मान्यवर.
इंटेक्स्पो प्रदर्शनात शिरिष बेरी यांचा गौरव
कोल्हापूर, ता. ३० : इंडियन इन्स्टिटयूट ऑफ इंटेरियर डिझाईनर्स कोल्हापूर विभागातर्फे आयोजित इंटेक्स्पो प्रदर्शनात आर्किटेक्ट शिरीष बेरी यांचा ‘आयकॉन ऑफ कोल्हापूर’ पुरस्काराने मानपत्र देऊन आयआयआयडी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आर्किटेक्ट सरोश वाडीया, आर्किटेक्ट हबिबखान यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. हॉटेल पॅव्हिलियन येथे प्रदर्शन झाले. बेरी म्हणाले, ‘निसर्गात राहून निसर्गावर प्रेम करत, निसर्गाचे देणे परत देण्याचा प्रयत्न करत आयुष्य जगतो. प्रत्येक वास्तू रचनेत निसर्गाचा अंतर्भाव केला. मला हा मानाचा ”घरचा आहेर” खूपच भावला आहे.’ अमरजा निंबाळकर यांनी मानपत्राचे वाचन केले तर मोहन वायचळ यांनी रचलेल्या मराठी मानपत्राचे वाचन चेअरमन चंदन मिरजकर यांनी केले. हबिबखान यांनी आपण डिझाईन केलेल्या विविध महत्वपूर्ण प्रकल्पांची माहिती दिली.तेजस्विनी मिरजकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिव गौरव काकडे यांनी आभार मानले. सुनील पाटील, खजानीस किशोर पाटील, उपाध्यक्ष शरद पवार, अभिजित चव्हाण, यशोराज मोहिते, संदिप बुवा, शांतीभाई लिंबाणी, प्रसन्न तावडे, महेश चौगुले, प्रशांत पाटील, सचिन बोरा, प्रथमेश महाजन, अमोल जाधव उपस्थित होते.