Source: Sakal Kolhapur
ich306.jpg99569इचलकरंजी : क्रीडा शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थी.बालाजी विद्यालयात क्रीडा शिबीरइचलकरंजी : बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रीडा शिबीराची सांगता झाली. शिबिरामध्ये अॅथलेटिक्स, योगा, बास्केट बॉल, रोल बॉल, कब्बडी, झुंबा डान्स व ट्रेकिंग अशा विविध क्रीडा प्रकाराचा समावेश होता. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना केळी, शेंगदाणे, गूळ, खजूर, असा पोषक आहार दिला. शिबिरात पाचवी ते नववीमधील ७२ विद्यार्थी सहभागी झाले होते. शिबिराचे आयोजन राजेश चौगुले, उत्तम मेंगणे, रवी चौगुले, सचिन खाडे यांनी केले होते. सहभागी विद्यार्थ्यांना उपमुख्याध्यापक डी.वाय. नारायणकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.———————ich307.jpg99570इचलकरंजी : कला शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची चित्रे काढली.
गंगामाई विद्या मंदिरमध्ये कला शिबीरइचलकरंजी : शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचा कला विकास होण्यासाठी चित्रकला व नाटय यांचे प्रशिक्षण दिले. कला शिक्षक सुरेंद्र दास यांनी मुलांना चित्रकलेतील रेखाटन, रंगभरण व नाट्य, अभिनय आवश्यक हावभाव, त्यातील बारकावे याचे मार्गदर्शन केले. सहा दिवस चाललेल्या शिबिरात मुले उत्साहात सहभागी झाली होती. उपक्रमासाठी संस्था अध्यक्षा मिना रानडे, उपाध्यक्षा प्रिती कट्टी, आर्या चांदेकर, मुख्याध्यापिका संध्या सोनवणे व शिक्षिका यांचे सहकार्य लाभले.———————मुसळे बाल विद्यामंदिरमध्ये शिबीरइचलकरंजी : तात्यासाहेब मुसळे बाल विद्यामंदिरमध्ये सहा दिवसाचे बालसंस्कार शिबीराचे आयोजन केले. शिबिराचे उद्घाटन मुख्याध्यापिका व्ही. एस. काडे यांनी केले. शिबिरात योगासन, झुंबा, प्रार्थना, मेडिटेशन, रांगोळी, मेहंदी, क्राफ्ट, नृत्य व रोप क्लायबिंग, केशभूषा, लाठी काठी, मातकाम, गाणी व नो फ्लेम रेसिपी यांचे आयोजन केले. सुरेखा कुंभार, सागर कुंभार, डी. एम. कस्तुरे, डी. बी. टारे, व्ही. जी. वरूटे उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका व्ही. एस. काडे यांनी केले. सुत्रसंचालन जे. एन. शेख व ए. आर. तराळ यांनी केले.————घोरपडे नाट्यगृह खासगी करण्यास विरोधइचलकरंजी : घोरपडे नाट्यगृह खाजगीकरण करू नये या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेतर्फे महापालिका प्रशासनास दिले. देखभाल दुरुस्ती त्यातील उत्पन्न यातून श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह भाडेतत्वावर महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे तर शहरातील संस्कृती वारसा जपण्यासाठी नाट्यगृह भाड्याने देऊ नये, असे निवेदनात नमूद केले आहे. शिष्टमंडळात अनिल कदम, रामचंद्र बागलकोटे, अनिल झाडबुके, रोहित कोटकर, किरण कोल्हापूरे आदी उपस्थित होते.