Source: Sakal Kolhapur
00557
सर्किट बेंचच्या निर्णायक लढ्यासाठी प्रयत्नशील ः ॲड. प्रशांत देसाई
कोल्हापूर, ता. ४ – सहा जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा अंतिम टप्यात असलेला मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापनेचा प्रश्न निर्णायक होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत नुतन अध्यक्ष ॲड. प्रशांत देसाई यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळाल्यानंतर आज अध्यक् व इतर कार्यकारणीपदग्रहण समारंभ न्याय संकुलमध्ये झाला. ॲड.देसाई यांची अध्यक्षपदी व इतर कार्यकारणी यांची पदाधिकारी म्हणून निवड झालेबद्दल आज जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने सत्कार समारंभ व पदग्रहण कार्यक्रम झाला. नुतन अध्यक्ष ॲड. देसाई, उपाध्यक्ष ॲड.विजयसिंह पाटील, सचिव ॲड. तेजगोंड पाटील, सहसचिव ॲड. जगजित अडनाईक, लोकल ऑडिटर ॲड. नवतेज देसाई, महिला प्रतिनिधी ॲड. अश्विनी भोसले, कार्यकारणी सदस्य ॲड. ऋषिकेश काकडे, बेनझीर जमादार, विनायक म्हांगोरे, सौरभ सरनाईक, विशाल धनवडे, अनिसा शेख, कुणाल नलवडे, विद्या निकम, ओंकार पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. शिवराम जोशी यांचा सत्कार केला.बार कौन्सिल महाराष्ट्र अँड गोवा चे सदस्य ॲड.विवेक घाटगे, मावळते अध्यक्ष ॲड.गिरीश खडके, शिवराम जोशी, अजित मोहिते, प्रशांत चिटणीस, अशोक पाटील, संपतराव पवार, प्रकाश मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल, ॲड. शिवाजीराव राणे, ॲड. संदीप चौगुले, संकेत सावर्डेकर, तृप्ती नलवडे, सतिश खोतलांडे, सुभाष पिसाळ उपस्थित होते. ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख प्रास्ताविक केले. माजी उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी आभार मानले.