Source: Sakal Kolhapur
लोगो
बाराशे स्पर्धकांची उत्स्फूर्त नोंदणी जयसिंगपूर हाफ मॅरेथॉन स्पर्धा; शुक्रवारी साहित्याचे वाटप
जयसिंगपूर, ता. ३: रोटरी क्लब जयसिंगपूर आणि राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फौंडेशनतर्फे रविवारी (ता. ७) शहरात होणाऱ्या भव्य हाफ मॅरेथॉन स्पर्धेसाठी बाराशे स्पर्धकांनी उस्फूर्तपणे नोंदणी केली आहे. शहरात प्रथमच अशी भव्य स्पर्धा होत आहे. तीन गटात होणाऱ्या स्पर्धेत सुमारे दीड लाखाहून अधिक रुपयांची बक्षीस दिली जाणार आहेत. ‘सकाळ माध्यम समूह’ स्पर्धेचे मीडिया पार्टनर असणार आहे. ५, १० आणि २१ किलोमीटर अशा तीन गटात स्पर्धा होणार आहे. अठरा वर्ष वयोगटापासून पुढे स्पर्धा होणार आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. याशिवाय फनरन अंतर्गतही मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे. स्पर्धकांना टी-शर्ट, प्रशस्तीपत्रक, मेडल, अल्पोपहार, फळे, एनर्जी ड्रिंक, वैद्यकीय सुविधा, वर्कआउटसाठी झुंबा आदींची व्यवस्था केली जाणार आहे. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर ते शिरोळ मार्गावरील के.पी.टी.पर्यंत स्पर्धेचा मार्ग निश्चित केला आहे. सहभागासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरण्याची सुविधा संयोजकांनी उपलब्ध करून दिली होती. मुदतीत बाराशे जणांनी विविध गटात सहभाग नोंदवून नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे…..
रोटरी हॉलमध्ये उद्या साहित्य वितरणस्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना संयोजकांच्यावतीने विविध साहित्य दिले जाणार आहे. या साहित्याचे किट शुक्रवारी (ता.५) छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल हॉल (रोटरी हॉल) येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे. ….
गट आणि धावण्याचा मार्ग * ५ किलोमीटर धावणे गटासाठी सातशे रुपये प्रवेश शुल्क असून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर ते डॉ. जे. जे. मगदूम इंजिनिअरिंग कॉलेज हा मार्ग असेल. * १० किलोमीटर गटासाठी नऊशे रुपये प्रवेश शुल्क असून त्यांच्यासाठी सिद्धेश्वर मंदिर ते केपीटी हा मार्ग निश्चित केला आहे. * २१ किलोमीटर गटासाठी अकराशे रुपये प्रवेश शुल्क असून त्यांच्यासाठी सिद्धेश्वर मंदिर ते केपीटी या मार्गावर दोन फेऱ्या निश्चित केल्या आहेत.