Source: Sakal Kolhapur
बाबासाहेब चौगुले यांचा वाढदिवस उत्साहातकुंभोज, ता. ४ ः कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. वाढदिवसानिमित्त सहकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांना प्रत्यक्ष भेटून व भ्रमनध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजुबाबा आवळे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार राजु शेट्टी, माजी आमदार सुजित मिणचेकर, जिल्हा परिषद माजी सदस्य राहूल आवाडे, स्वप्निल आवाडे, डी. सी. पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या. बीपीसी पेटोलिंक्स काया॔लयात किरण माळी, माजी सरपंच प्रकाश पाटील, अनिल भोकरे, तेजस कोळी, अजित गोपुडगे, रविंद्र कागवाडे, शितल कळंत्रे, युनुस मुजावर, भूषण कोले आदिंनी शुभेच्छा दिल्या. माजी उपसरपंच अनिकेत चौगुले यांनी आभार मानले.