Source: Sakal Kolhapur
अडते व्यापारी गटाच्या निकालावर आक्षेप बाजार समिती निवडणूक; जिल्हा सहकार उपनिबंधकांकडे अर्ज दाखल कोल्हापूर ,ता. ४ ः जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप नोंदवणारा अर्ज आज जिल्हा सहकार उपनिबंधकांकडे दाखल झाला. व्यापारी अडते गटाची झालेली निवडणूक रद्द करावी, नव्याने निवडणूक घ्यावी अशा मागणीसह व्यापरी अडते गटातील निवडणूक प्रक्रियेवर पाच आक्षेप या अर्जात नोंदवले आहेत. नयन प्रसादे यांच्या वतीने अर्ज दाखल झाला आहे. निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, निवडणूक निर्णय अधिकारी, बाजार समितीसह नव्याने निवडून आलेल्या १७ संचालकांच्या निर्णयाविरोधात आक्षेप घेण्यात आलेत. निकालानंतर आक्षेप नोंदविण्याची मुदत सोमवारपर्यंत आहे. याच कालावधीत प्रसादे यांनी वाद विवाद अर्ज जिल्हा सहकार उपनिबंधकाकडे दाखल केला. यात उपस्थित केलेले मुद्दे असे की, मतदार यादीत व्यापारी परवानाधारकांच्या नाव नोंदीत तांत्रीक उणीवा होत्या. तिच यादी अंतिम मतदार यादी म्हणून घोषीत झाली. त्यावर आलेल्या हरकती फेटाळाल्या आहेत. तसेच अंतिम मतदार यादीच बेकायदा आहे.बाजार समितीची येणे बाकी असल्याने माजी संचालक निवडणुकीस अपात्र असतानाही त्यांना निवडणुकीत स्थान लाभले, काही मुद्दावर उच्च न्यायालयात दावा दाखल आहे तरीही माजी संचालकांना निवडणूक लढवली. ‘एकच व्यक्ती एकच मतदान’ अशा आशयाचे आदेश काढले. त्यामुळे अनेक मतदार मतदानांपासून वंचित राहिले. व्यापारी, अडते गटात नंदकुमार वळंजू व वैभव सावर्डेकर यांना विजयी घोषीत केले तरीही फेर मतमोजणीनंतर चिठ्ठी टाकून किशोर आहुजा यांना विजयी घोषीत केले गेले, अशा आशयाचे आक्षेप नोंदविले आहेत.
चौकट अजेंडा कमी आक्षेप जास्त बाजार समितीची निवडणूक यादीत ग्राम पंचायतीच्या जुन्या सदस्यांची मतदार म्हणून नावे, त्यामुद्दावर निवडणूक पुढे ढकलली त्यानंतर मतदार यादीवर आक्षेप आले त्यात सुधारणा करावी लागली. व्यापारी मतदार नोंदीवरही अक्षेप आले इथपासून ते चिठ्ठ्या टाकून निकालापर्यंत अनेक बाबींवर आक्षेप आले. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक प्रक्रीया सुरवाती पासून आक्षेपांनी भरली शेवटही आक्षेपानेच झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकरी हिताचा अजेंडा कमी आणि आक्षेपच जास्त चर्चेत आले.