बाईकवरून लडाखला चाललेल्या जोडप्याचा प्रवास अखेरचा ठरला; लखनौजवळ दुर्दैवी मृत्यू

Facebook
LinkedIn
WhatsApp
लडाख दौऱ्यासाठी निघालेल्या या जोडप्याचा उत्तर प्रदेशात दुर्दैवी मृत्यू झाला.

Source: Lokmat National

लखनौ – उत्तर प्रदेशची राजधानी लखनौपासून ३० किमी अंतरावर बाराबंकी इथं शनिवारी रस्ते अपघातात एका जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ५३ वर्षीय सुब्रत सान्याल आणि त्यांची पत्नी परमिता हे दोघे लडाखसाठी बाईक रायडिंग करत होते. पूर्वांचल एक्सप्रेस वेवर एका दुभाजकाला धडकून या जोडप्याच्या बाईकचा अपघात झाला. यावेळी दोन्ही दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

मागील अनेक वर्षापासून हे जोडपे बाईकवरून विविध ठिकाणी पर्यटनासाठी जात असतात. परंतु हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील अखेरचा ठरला. मिळालेल्या माहितीनुसार, सुब्रत आणि परमिता यांना २ मुले आहेत. ज्यातील १ संगीतकार असून तो आर्किटेक्चरचे शिक्षण घेत आहे. तर दुसरा मुलगा सृजन हा नरेंद्रपूर येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नववीच्या वर्गात शिकतो. सुब्रत हे इंजिनिअरिंग कंसल्टेंसी फर्मचे मालक होते तर परमिता या इंटिरियर डिझाइनर होत्या. 

बाराबंकी पोलीस स्टेशनचे अधिकारी दीपक पांडे यांनी म्हटलं की, या बाईक अपघातात सुब्रत यांच्या डोक्याला मार लागला होता. तर सुब्रत यांच्या पत्नी परमिता या काही अंतरावर जाऊन पडल्या. या दोघांना स्थानिकांनी तातडीने हॉस्पिटलला आणले परंतु त्याठिकाणी डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. आधार कार्ड आणि फोनवरून दोघांची ओळख पटली. पोलिसांनी सुब्रत यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना फोन करून घटनेची माहिती दिली. सुब्रत यांच्या मृत्यूची बातमी मिळताच मित्र अमिताव सान्याल बाराबंकीला पोहचले. सुब्रत आणि परमिता याआधी ओडिशा आणि मध्य प्रदेशात बाईक रायडिंग करत होते. 

सुब्रत आणि परमिता या दोघांनाही बाईक चालवण्याची आवड होती. बाइकिंग आणि एडवेंचरचा छंद असलेल्या दोन्ही दाम्पत्यांना कधीही वयाचा अडथळा आला नाही. मुले शिक्षणात व्यस्त होते तर दाम्पत्य वेळ काढून नेहमी पर्यटनाला बाहेर जायचे. लडाख दौऱ्यासाठी निघालेल्या या जोडप्याचा उत्तर प्रदेशात दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवले. त्यानंतर मुलांना मृतदेह सुपूर्द केले. लखनौच्या स्मशानभूमीत या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Marathi News
LATEST
>>कोल्हापूर : वेतवडे येथे धामणी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू>>कांदा झाला स्वस्त>>पेठवडगाव: अपघात जोड>>पोलीस कोठडी>>पिवळे सोने झाले मातीमोल>>युथ समिट ऑफ समर अधिवेशन>>सीपीआर रक्षकावर हल्ला गुन्हा दाखल>>Kolhapur : हत्तीवरून मिरवणुकीने कन्याजन्माचे स्वागत; पाटील कुटुंबीयांचा आदर्श उपक्रम>>लॉरी ऑपरेटर्स हेल्मेट>>नेते, संचालक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी>>मुश्रीफ कार्यक्रम>>नागोजीराव पाटणकर हायस्कूल बातमी>>ओबीसी आरक्षण वाढवण्याचा निर्णय चुकीचा ः ॲड.इंदुलकर>>‘आरसीसी-एसईटी’साठी रविवारी स्कॉलरशिप परीक्षा>>भाजप कार्यालय प्रवेश>>जंगम समाज संस्कार शिबीर>>मराठा महासंघ मेळावा>>झूम प्रकल्प पाहणी>>सौंदाळेच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू>>प्रकाशन
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: