बस्तवडेत २९ रोजी संगीत भजन स्पर्धेचे आयोजन

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

51435कृष्णा डेळेकर, विजय पाटील, अंबाजी बिराडे

वनरक्षक-वनपाल संघटनेच्याजिल्हाध्यक्षपदी कृष्णा डेळेकरचंदगड ः राज्य वनरक्षक-वनपाल संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी येथील वनपाल कृष्णा डेळेकर यांची निवड झाली. कार्याध्यक्षपदी अंबाजी बिरडे (करवीर), तर सचिवपदी विजय पाटील (करवीर) यांची निवड झाली. संजय कांबळे (राधानगरी), अमर मनाने (पन्हाळा), नेताजी धामणकर (पाटणे), कुंडलिक कांबळे (पन्हाळा), सुरेश पटकारे (राधानगरी), सुप्रिया पाटील (कोल्हापूर), प्रतिभा पाटील (करवीर), प्रियांका पाटील (आजरा), अश्विनी सरगर (कोल्हापूर), प्रकाश शिंदे (पाटणे), मौलामुबारक सनदी (पाटणे), कैलास सानप (चंदगड), खंडू कातकडे (चंदगड), संजय निळकंठ (आजरा), राहूल कांबळे (आजरा), ओंकार जंगम (कडगाव), संतोष गोजारे (कडगाव), आशिष चाळसकर (गारगोटी), हर्षद कोठीवाले (गारगोटी) यांची संघटनेच्या विविध पदांवर निवड झाली.

‘स्वरतरंग’तर्फे आज कार्यक्रमइचलकरंजी : स्वरतरंग संगीतप्रेमी मंच, कोल्हापूरतर्फे ‘दिल की आवाज भी सून’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचा संगीतप्रेमी रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. मोफत प्रवेशिकेसाठी सुरेश लोले, रामचंद्र निमणकर, शीतल सातपुते यांच्याशी संपर्क साधावा.

कौलवमध्ये रविवारी रक्तदान शिबिरशाहुनगर ः कौलव (ता. राधानगरी) येथे शहीद जवान स्वप्निल चरापले यांच्या स्मृतिदिननिमित्त रविवारी (ता. २५) सकाळी दहा वाजता येथील मारुती देवालयात रक्तदान शिबिर, पुरस्कार वितरण व गुणवंतांचा सत्कार समारंभ होणार आहे. करवीरचे पोलिस उपअधिक्षक मंगेश चव्हाण, डॉ. रवि जाधव, मारुती पाटील, महेश डोंगळे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. सदाशिवराव चरापले, उदयसिंह पाटील, धैर्यशील पाटील, चंद्रकांत पाटील, सुशील पाटील, रविश पाटील, सरपंच सविता चरापले, विजय पाटील, के. द. पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शहीद फौंडेशनचे अध्यक्ष पंकज पाटील व उपाध्यक्ष ओंकार पाटील यांनी केले आहे.

२९९९नरतवडे उपसरपंचपदी गुरव बिनविरोधसरवडे : नरतवडे (ता. राधानगरी) येथील उपसरपंचपदी जनता दलाचे बाबुराव मारुती गुरव यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रद्धा आप्पासाहेब पाटील होत्या. उपसरपंच सहदेव कांबळे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेवर ही निवड केली. गटनेते रंगराव मगदूम, सुरेश पाटील, फत्तेसिंग पाटील, राजेंद्र पाटील, सुरेश चौगले, भीमराव नलवडे, व्ही. टी. एरुडकर, सदस्य सुजाता पाटील, सुजाता मुसळे, वंदना शिंदे, धनश्री एरुडकर, सुरेखा कुंभार, विलास सावंत, सहदेव कांबळे उपस्थित होते. ग्रामसेविका सरीता प्रविण पाटील यांनी आभार मानले.

१८१०वाढदिवसानिमित्त वाचनालयाला पुस्तके भेटबोरपाडळे : शहापूर (ता. पन्हाळा) येथील हनुमान सार्वजनिक वाचनालयाला रुचिता पाटील या विद्यार्थिनीने वाढदिवसानिमित्त पुस्तके भेट दिली. वाचनालयाच्या ग्रंथ भांडारात भर पडावी. विद्यार्थ्यांनी वाचनाकडे वळावे तसेच वाढदिवसाचा खर्चाला फाटा देत हा उपक्रम राबवल्याचे रुचिताने सांगितले. वाचनालायचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील आणि ग्रंथपाल जोतिराम सांगले यांच्याकडे पुस्तकांचा संच प्रदान केला. गावभाग पोलिस ठाण्याचे आदर्श पोलिस पुरस्कारप्राप्त मच्छिन्द्र पाटील उपस्थित होते.

१६५४प्रा. डॉ. पी. आर. फराक्टे यांचा सत्कारपिंपळगाव ः दिंडेवाडी (ता. भुदरगड) येथील अंबाबाई दूध संस्थेच्या वतीने प्रा. डाॕ. पी. आर. फराक्टे यांचा सत्कार केला. डॉ. फराकटे यांनी पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल दूध संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम घेतला. अध्यक्षस्थानी निवृत्त पोलिस आनंदराव फराक्टे होते. डॉ. फराक्टे सदाशिवराव मंडलिक महाविदयालयात इतिहास विभागप्रमुख आहेत. शशिकांत फराकटे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ए. एम. फराकटे, विलास फराकटे, माजी सरपंच बळवंत शिंदे, सागर पाटील, मारुती पाटील, सुभाष बुरबुसे, सीताराम पाटील, वसंत भरिष्टे, अनिकेत फराकटे, भैरू फराक्‍टे, दिनकर बुरबुसे, यशवंत फराकटे, धोंडिबा फराकक्‍टे, प्रकाश फराक्‍टे, अशोक फराक्‍टे उपस्थित होते. एस. आर. फराक्‍टे यांनी आभार मानले.

बस्तवडेत २९ ला संगीत भजन स्पर्धाम्हाकवे : बस्तवडे (ता. कागल) येथील विठ्ठल भजनी मंडळाने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गुरुवार (ता. २९) जगदंबा मंदिरासमोर विठ्ठल पंथी संगीत भजन स्पर्धा होणर आहे. प्रथम क्रमांक ६००१ रुपये व चषक, द्वितीय ४५०० रुपये व चषक, तृतिय ३५०० रुपये व चषक, उत्तेजनार्थ १५०० रुपय व चषक आहे. विशेष उत्तेजनार्थ १००० रुपयांची दोन बक्षिसे, प्रोत्साहनपर : ५५१ रुपयांची दोन बक्षिसे, उत्कृष्ट तबला वादक व हार्मोनियम वादक अशी प्रत्येकी ५०१ प्रमाणे दोन बक्षिसे व उत्कृष्ट गायक /गायिका यास ५०१ रुपयांचे बक्षीस असेल. सायंकाळी ७ वाजता स्पर्धा सुरू होईल. एका व्यक्तिस एकाच संघात सहभागी होता येईल. सादरीकरणास १५ मिनिटे वेळ असेल. तबला किंवा पखवाज वादक वगळता सर्व संघ एकाच गावचा हवा यासाठी आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र पाहिले जाईल.

eZy News
LATEST
>>गुंडाचा डोक्यात दगड घालून खून>>आजरा येथे जुगार आड्यावर छापा.>>झुलन गोस्वामीची अखेरची लढत>>Lumpy skin disease : लम्पी स्कीनप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका>>कागल : राष्ट्रवादी पक्षाची विजयाची नांदी – आमदार हसन मुश्रीफ>>चंदगडी हिसका दाखवू>>शिराळा : विश्वास कारखाना वार्षिक सभा>>राक्षीतील घरफोड्याला अटक; वाघबीळ घाटात कारवाई, घरफोडीतील सोन्या-चांंदीचे दागिने जप्त>>शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही – मंत्री केसरकर>>गांधी समजून घेताना>>कोल्हापूरला जयपूर करू -नुतन पालकमंत्री दीपक केसरकर>>म.ह. शिंदे महाविद्यालय>>जातिविहीन व्हा, उच्चनिचतेच्या भिंती जमीनदोस्त करा”>>अन्नपुर्णा’ शुगरचा सोमवारी द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ>>‘सीबीआय’ कडून कागलमधील तरुणाची चौकशी>>लम्पी>>लव्हटे परिसंवाद>>कोजिमाशिची आज वार्षिक सभा>>नवरात्रोत्सव>>६५ हजारांचे दागिने जप्त
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: