Source: Sakal Kolhapur
इचलकरंजील पालकांची ९ लाखांची फसवणूकमुलींना आयुर्वेदिक मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याचे आमिष
इचलकरंजी, ता.४ : मुलींना आयुर्वेदिक मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश देतो असे आमिष दाखवून दोन पालकांची तब्बल 9 लाख 65 हजार रूपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी येथील एका खासगी क्लासचालकासह चार जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अवधूत कुंभार (रा. कोल्हापूर सध्या रा.कलानगर इचलकरंजी), नवीन बी लिंगायत, बमा पाडा माजी उर्फ समीर (दोघे रा. बंगळूर), अरुण गोस्वामी (रा.नवी दिल्ली) अशी त्यांची नावे आहेत.शिवाजीनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरात अवधूत कुंभार हा इंजिनिअरिंग व मेडिकल प्रवेश अभ्यासक्रमाचे खासगी क्लास चालवतो. यातून त्याच्याशी रशिद कलावंत व त्याचा मित्र जयवंत म्हेत्तर यांची ओळख झाली. दोघांच्या मुलींना कुंभार याने बंगळूर येथील आयुर्वेदिक मेडीकल कॉलेजमध्ये अॅडमिशन करून देतो असे सांगितले. यासाठी बंगळूरच्या नवीन बी लिंगायत, बमा पाडा माजी उर्फ समीर यासह दिल्लीचे अरूण गोसावी हे मेडिकल कॉलेजचे संचालक असल्याचे सांगत भेट घालून दिली. चौघाजणांनी अॅडमिशन करून देतो म्हणून सांगत 14 लाख 45 हजार रूपयांची रक्कम घेतली. सुरुवातीला बंगळूर येथे दोघांकडून रोख तीन लाख आणि दोन लाखाचे धनादेश घेतले. तसेच इचलकरंजीत परतल्यावर आणखी लाखो रुपये बँक खात्यात पाठवण्यास सांगितले. मात्र, अनेक दिवस झाले तरी अॅडमिशन करून दिले नाही. त्यामुळे 14 लाख 45 हजार रूपयांपैकी 4 लाख 80 हजार परत दिले. उर्वरित 9 लाख 65 हजार सदरची रक्कम न देता फसवणूक केली. याप्रकरणी रशिद दस्तगीर कलावंत ( वय 42, रा. गुरूकन्नननगर, पाटील गल्ली) यांच्या फिर्यादीनुसार चौघांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
चौकटटोळीचा अनेकांना गंडासंशयित बंगळूरच्या नवीन बी लिंगायत, बमा पाडा माजी उर्फ समीर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, तर दिल्लीचा अरूण गोसावी हा रेड फ्लॉवर नावाची कन्सल्टन्सी चालवतो. हे तिघे अनेकांना हाताशी धरून ॲडमिशन करून देतो म्हणून फसवणूक करतात. शहरातील क्लासचालक कुंभार यांना हाताशी धरले आणि शहरातीलच दोन पालकांचे त्यांनी फसवणूक केली.