Source: Sakal Kolhapur
03189भाग्यश्री चोपदार यांची निवड माजगाव ः महाराष्ट्र राज्य पोलिस सेवा मंडळाच्या कोल्हापूर शहराध्यक्षपदी भाग्यश्री चोपदार यांची निवड झाली. पोलिस सेवा मंडळाचे राज्याध्यक्ष विजय नवले यांच्या हस्ते व जिल्हा संपर्कप्रमुख अनिल चोपदार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करणे, पोलिसांच्या व कुटुंबीयांच्या समस्यांची माहिती संकलित करून कार्यवाहीसाठी राज्यस्तरीय कमिटीला पाठवणे असे कार्य पोलिस सेवा मंडळातर्फे होते.