Source: Sakal Kolhapur
बसस्थानक परिसरातून महिलेची बॅग चोरीसकोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्स येथे ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोरून चोरट्याने महिलेची बॅग पळविली. सोमवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली. याची फिर्याद मनीषा गोविंद चौगुले (रा. मेंढोली, ता. आजरा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. बॅगेत लॅपटॉप, मोबाईल हॅण्डसेट, साडेचार हजार रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे होती, असा उल्लेख फिर्यादीत आहे.————मोहिते पार्कमधील मिठारी मळ्यात मारामारीकोल्हापूर : मोहिते पार्क येथील मिठारी मळ्यात पूर्ववैमनस्यातून दोन कुटुंबांत मारामारी झाली. सोमवारी झालेल्या या मारामारीची परस्पर विरोधी फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाली. याबाबत सर्जेराव आनंदराव जाधव (वय ६१) आणि गजानन बाळासाहेब जगताप (वय ५३, दोघे रा. मोहिते पार्क, मिठारी मळा, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिल्याचे पोलिसांनी सांगितले.—————-महिलांना शिवीगाळ, कदमवाडीत एकावर गुन्हाकोल्हापूर : नळाचे पाणी भरताना सागर बरगे (रा. कदमवाडी, कोल्हापूर) याने महिलांना शिवीगाळ केली. याबाबत महिलांनी जाब विचारला असता, त्याने दगड फेकून मारल्याने जिया ओम लोखंडे (रा. कदमवाडी) या जखमी झाल्या. कदमवाडी येथील सह्याद्री कॉलनीत रविवारी सकाळी हा प्रकार घडला. याबाबत पूजा मंगळाकर भास्कर (रा. कदमवाडी) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित सागर बरगे याच्यावर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.————–बुरुड गल्लीत तरुणास मारहाणकोल्हापूर : शनिवार पेठेतील बुरुड गल्लीत रविवारी रात्री चौघांनी एकास मारहाण केली. सौरभ उमेश ससे (वय २४, रा. शनिवार पेठ, कोल्हापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात संशयित संजय बाबूराव ससे (वय ५५), आरती संजय ससे (वय ४५), निखिल संजय ससे (वय २३) आणि संदीप जाधव (वय ४०, सर्व रा. बुरुड गल्ली, शनिवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.