पोट साफ होतच नाही? चमचाभर तूप आणि चिमूटभर सैंधव मिठाचा १ सोपा असरदार उपाय

Facebook
LinkedIn
WhatsApp
Constipation Ayurvedic Home Remedies : गॅस्ट्रोपेरिसिस असलेल्या व्यक्तीला पोटात सूज येणं, पोटदुखी, उलटी,  एसिडिटी, अपचन यांसारख्या समस्या उद्भवतात.

Source: Lokmat Health

अनियमित जीवनशैली खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा यामुळे पोट साफ न होण्याचा त्रास उद्भवतं. सकाळी व्यवस्थित पोट साफ झालं नाही तर संपूर्ण दिवसच खराब जातो. पोट साफ होण्यासाठी काही आयुर्वेदीक उपाय परिणामकारक ठरू शकतात. गॅस्ट्रोपेरिसिस अशी स्थिती आहे. ज्यामुळे मांसपेशीवर परीणाम होतो आणि पचनसंस्था मंदावते. यामुळे पोट साफ होणं कढीण होतं. (Constipation Ayurvedic Home Remedies) गॅस्ट्रोपेरिसिस असलेल्या व्यक्तीला पोटात सूज येणं, पोटदुखी, उलटी,  एसिडिटी, अपचन यांसारख्या समस्या उद्भवतात. (Ayurvedic Remedies for Constipation)

पोट साफ न होण्याचा  त्रास उद्भवू  नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा

1) पाणी तुमच्या पोटातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.  हायड्रेट राहून पचनक्रिया चांगली राहते. याशिवाय सकाळी सगळ्यात आधी कोमट पाणी प्यायल्यानं कोलन स्वच्छ होण्यास मदत होते.

2) एक ग्लास कोमट पाण्यात 2-3 चमचे गुलाबी किंवा समुद्री मीठ मिसळा आणि ते रिकाम्या पोटी प्या. हे काही मिनिटांत तुमचे कोलन साफ ​​करेल.

पोट आणि मांड्या खूप सुटल्या, जाडजूड दिसता? ६ पदार्थ रोज खा, घटेल चरबी लवकर

3) फायबर्स तुमची पचनक्रिया चांगली ठेवण्यास फायदेशीर ठरतात हेल्दी कोलन साठी हे इंधनाप्रमाणे काम  करतात. हाय फायबरमध्ये अनेक फळं आणि भाज्यांचा समावेश असतो. जसं की सफरचंद, पिअर, स्ट्रॉबेरी, गाजर यांमध्ये फायबर्स असतात. इतर फायबर्सयुक्त पदार्थांमध्ये  बीन्स, दाळी, चणे,क्विनोआ, ओट्स यांचा समावेश होतो.

4) आलं आणि लाल मिरचीसारख्या औषधी पदार्थांमध्ये रोगाणूंविरोधी फायटोकेमिकल्स असतात. यामुळे खराब बॅक्टेरीया दाबले जातात आणि गॅस, एसिडिटीपासून आराम मिळवण्यास मदत होते.

5) पोट साफ करण्यासाठी सगळ्यात इफेक्टिव्ह उपायांमध्ये आल्याचा समावेश होतो. आलं एंटीऑक्सिडंट्सयुक्त असते. यामुळे कोलनमधील सूज कमी होते आणि कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमी होतो.

कॉन्स्टिपेशनचा त्रास टाळण्याचा आयुर्वेदीक उपाय

जेवताना जर तुम्ही २ चपात्या खात असाल तर  १ चपाती खाल्ल्यानंतर चमचाभर तुपात चिमुटभर सैंधव मीठ घाला आणि ते  खा. नंतर उरलेलं जेवण पूर्ण करा. या उपायामुळे अन्नाची हालचाल सुरळीत होते आणि आतड्यांमधील अन्न सहज पुढे ढकलले जाते. अन्नपचन व्यवस्थित होऊन पोट देखील साफ राहते. 

Marathi News
LATEST
>>कोल्हापूर : वेतवडे येथे धामणी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू>>कांदा झाला स्वस्त>>पेठवडगाव: अपघात जोड>>पोलीस कोठडी>>पिवळे सोने झाले मातीमोल>>युथ समिट ऑफ समर अधिवेशन>>सीपीआर रक्षकावर हल्ला गुन्हा दाखल>>Kolhapur : हत्तीवरून मिरवणुकीने कन्याजन्माचे स्वागत; पाटील कुटुंबीयांचा आदर्श उपक्रम>>लॉरी ऑपरेटर्स हेल्मेट>>नेते, संचालक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी>>मुश्रीफ कार्यक्रम>>नागोजीराव पाटणकर हायस्कूल बातमी>>ओबीसी आरक्षण वाढवण्याचा निर्णय चुकीचा ः ॲड.इंदुलकर>>‘आरसीसी-एसईटी’साठी रविवारी स्कॉलरशिप परीक्षा>>भाजप कार्यालय प्रवेश>>जंगम समाज संस्कार शिबीर>>मराठा महासंघ मेळावा>>झूम प्रकल्प पाहणी>>सौंदाळेच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू>>प्रकाशन
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: