Source: Sakal Kolhapur
gad25.jpg00044गडहिंग्लज : महाराष्ट्र दिनानिमित्त पालिकेतर्फे सफाई कामगारांना पुरस्काराद्वारे स्वरुप खारगे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी श्वेता सुर्वे, निखील पाटील, ओंकार बजागे, प्रकाश शिवणे उपस्थित होते.—————————————————————पालिकेतर्फे सफाई कामगारांचा गौरवमहाराष्ट्र, कामगार दिन उत्साहात; गडहिंग्लजला विविध उपक्रमांचे आयोजनसकाळ वृत्तसेवागडहिंग्लज, ता. २ : शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र व कामगार दिन विविध उपक्रमांनी साजरा केला. नगरपरिषदेच्यावतीने सफाई कर्मचाऱ्यांना सफाई मित्र व जीवन गौरव पुरस्काराने गौरवले. सीएसआर अंतर्गत पालिकेला मिळालेल्या सोलर पथदिव्यांचे लोकार्पणही केले.सकाळी मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले. त्यानंतर गडहिंग्लजच्या स्वच्छतेसाठी धडपडणाऱ्या सफाई कामगारांचा गौरव केला. उत्कृष्ठ सफाई कर्मचारी म्हणून श्रीमती रेखा डावाळे यांना जीवनगौरव पुरस्कार व रोख दहा हजार रुपये पारितोषिक देवून गौरवले. उत्कृष्ठ नालेसफाई कर्मचारी म्हणून संजय कांबळे, श्रीमती वंदना माने, उत्कृष्ठ शौचालय स्वच्छता कर्मचारी म्हणून किरण घारवे तर उत्कृष्ठ मुकादम रामा लाखे यांना प्रत्येकी पाच हजार रोख व सफाईमित्र पुरस्काराने सन्मानित केले. कॅनरा बँकेमार्फत सीएसआर अंतर्गत नगरपरिषदेस प्रदान केलेले सोलर पथदिवे नाना-नानी पार्क व नक्षत्र उद्यान येथे बसवले. त्याचे उदघाटन श्री. खारगे व बँकेचे व्यवस्थापक आदित्यकुमार सपकाळे यांनी केले. सोलर दिव्यामुळे बागामधील विजेची बचत व अपारंपारिक ऊर्जा वापरास प्रोत्साहन मिळणार आहे. विद्युत अभियंता धनंजय चव्हाण, नगर अभियंता निखिल पाटील, पाणीपुरवठा अभियंता अनिल गंदमवाड, आरोग्य निरीक्षक प्रकाश शिवणे, ओंकार बजागे, श्वेता सुर्वे, अवंती पाटील आदी उपस्थित होते.
* शिवराज महाविद्यालययेथील शिवराज महाविद्यालयात ‘महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. एन. सी. सी. विभाग प्रमुख डॉ. राहुल मगदूम यांनी स्वागत केले. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्याहस्ते ध्वजवंदन केले. आजरा महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. धनंजय पाटील, केमिस्ट्री विभाग प्रमुख डॉ. ए. एम. हसुरे आदी उपस्थित होते.
* संविधान सन्मान परिषदकामगारदिनानिमित्त संविधान सन्मान परिषदेच्यावतीने अॅट्रॉसिटी, महिला, इतर कायदे व भारतीय संविधान या विषयावर चर्चा-संवादाचा उपक्रम राबवला. कारवा संघटनेचे मुख्य सल्लागार अॅड. अंबादास बनसोडे यांनी राज्यात कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी चळवळ सुरु करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. अॅड. रामजी कोतले यांनी कायद्यांचे प्रशिक्षण घेतल्याशिवाय चळवळ उभी राहू शकत नसल्याचे सांगितले. परिषदेचे मुख्य संघटक संग्राम सावंत यांनी या उपक्रमामागचा हेतू सांगितला. तानाजी कुरळे, प्रकाश कांबळे, दिगंबर विटेकरी, विनायक नाईक, परशुराम कांबळे, भीमराव तराळ, वसंत शेटके आदी उपस्थित होते. प्रकाश कांबळे यांनी प्रास्ताविक केले. तानाजी कुरळे यांनी आभार मानले.
* माद्याळला सुरक्षा संच वाटपकामगार दिनानिमित्त माद्याळ कसबा नूल गावात बांधकाम कामगारांना सुरक्षा संचचे वाटप करण्यात आले. सोमलिंग सेवा संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ घेजी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाबळेश्वर चौगुले अध्यक्षस्थानी होते. शामराव घेजी, सुजित पाटील, महेश चिनगोंडा यांच्या हस्ते ६२ बांधकाम कामगारांना सुरक्षा संच दिले. सोम पाटील यांनी कामगार योजनेची माहिती दिली. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, संचालक गुरगोंडा पाटील, अशोक गवळी, प्रशांत पाटील, अनिल हेबाळे, गणेश सुतार, अर्जून हमाण्णावर आदी उपस्थित होते. सोमा घेजी यांनी आभार मानले.
* क्रिएटिव्हमध्ये महाराष्ट्र दिनगडहिंग्लजच्या क्रिएटिव्ह हायस्कूल व ज्यु. कॉलेज ऑफ सायन्समध्ये महाराष्ट्र दिन साजरा केला. सचिव आण्णासाहेब बेळगुद्री यांनी ध्वजवंदन केले. मुख्याध्यापक दिनकर रायकर, सविता बेळगुद्री आदी उपस्थित होते. क्रीडाशिक्षक एन. जी. सुतार, पी. जे. मोहनगेकर, एस. एन. पोवार व शिक्षकांनी नियोजन केले होते. जोतिबा पाटील यांनी प्रास्ताविक केले. वासीम मकानदार यांनी सूत्रसंचालन केले. संदीप शिंदे यांनी आभार मानले.
* ओंकार महाविद्यालययेथील ओंकार वरिष्ठ व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागातर्फे महाराष्ट्र व कामगार दिन साजरा झाला. बेळगावच्या मराठा मंडळ डेंटल कॉलेजचे डॉ. तुषार बांदिवडेकर यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले. प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. संस्था उपाध्यक्ष डॉ. ऋतुजा बांदिवडेकर, संचालक उद्धवराव इंगवले आदी उपस्थित होते.—————————————————-चंदगड तालुक्यात सांस्कृतिक कार्यक्रमचंदगडः तालुक्यात गावागावात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा केला. यानिमित्त ध्वजवंदन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. येथील तहसिल कार्यालयात तहसिलदार राजेश चव्हाण यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले. अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षा प्राची काणेकर यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले. उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, नगरसेवक झाकीर नाईक, शिवानंद हुंबरवाडी, अॅड. विजय कडूकर, मुख्याधिकारी स्वरुप खारगे, प्रशासकीय अधिकारी आशुतोष प्रधान आदी उपस्थित होते. दरम्यान खालसा सावर्डे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग बांधव संदीप जोतिबा पाटील व त्यांच्या पत्नी सुप्रिया यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले. सरपंच, उपसरपंचासह सर्व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.——————–आजरा तालुक्यात महाराष्ट्र दिन उत्साहातआजरा ः तालुक्यात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा झाला. शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायती व विविध संस्थामध्ये ध्वजवंदन झाले. शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. आजरा तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार समीर माने यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले. निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, महसुल नायब तहसीलदार विकास कोलते, नायब तहसीलदार डी. डी. कोळी आदी उपस्थित होते. पंचायत समितीमध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले. विविध विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते. आजरा पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल हारुगडे यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले. तालुका कृषी कार्यालयामध्ये तालुका कृषी अधिकारी के. एन. मोमीन यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले. आजरा महाल शिक्षण संस्थेमध्ये संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले. आजरा हायस्कूलमध्ये जनता एज्युकेशन सोसायटी आजरा संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले.—————–उत्तूरला गुणवंतांचा सत्कारउत्तूर ः येथील ग्रामपंचायतीमध्ये कामगार दिन साजरा झाला. कामगार बाळू येमगेकर व अमृत रेडेकर यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले. ग्रामपंचायत कार्यालयाचे सफाई कामगार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सरपंच किरण आमणगी, उपसरपंच समीक्षा देसाई, ग्राम विकास अधिकारी आर. वाय. नुल्ले आदी उपस्थित होते. दरम्यान पार्वती – शंकर शैक्षणिक संस्थेत महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बसवराज करंबळी होते. सहायक अभियंता विनायक करंबळी व पालक प्रतिनिधी रामचंद्र तांबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.————कोलेकर महाविद्यालयनेसरी : येथील तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाध्ये महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन उत्साहात झाला. प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले. डॉ. भूपाल दिवेकर यांनी महाराष्ट्र गीताचे गायन केले. डॉ. एम. एस. कोळसेकर, डॉ. कंचन बेल्लद, मोहन शिंदे आदी उपस्थित होते.