Source: Sakal Kolhapur
आजच्या बातमीचे कात्रण वापरणे—————chd34.jpg 02718पारगड : विहिरीतील पाणीपातळीचा आढावा तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे आदिंनी घेतला.—————————————पारगड, नामखोलसाठी टँकरचा प्रस्तावगटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे; प्रशासनाकडून गावाला भेट देऊन पाहणीसकाळ वृत्तसेवा चंदगड, ता. ३ : किल्ले पारगड व नामखोल (ता. चंदगड) या दोन गावांसाठी तीव्र पाणीटंचाई विचारात घेता टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. तहसीलदार राजेश चव्हाण व गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी ही माहिती दिली.पारगड व नामखोल या दोन्ही गावांसाठी पाण्याचा प्रश्न ज्वलंत झाला आहे. यासंदर्भात आज ‘सकाळ’मधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तहसीलदार चव्हाण, गटविकास अधिकारी बोडरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उप अभियंता सुभद्रा कांबळे, कनिष्ठ अभियंता पृथ्वीराज पाटील, ग्रामसेवक संतोष तांबडे आदींनी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत पारगड, नामखोल व मिरवेल या तिन्ही गावांना भेट दिली. परिस्थितीचा आढावा घेतला. पारगड व नामखोल येथे पाणी पुरवण्याच्या दृष्टीने अन्य उपाययोजना उपयोगाच्या नसल्यामुळे येथे टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. इसापूर येथील तलावातून टॅंकरने या दोन गावांना पाणीपुरवठा करण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी बोडरे यांनी सांगितले. सरपंच संतोष पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.