Source: Sakal Kolhapur
00247गडहिंग्लज : यशस्वी विद्यार्थ्यासमवेत वि. दि. शिंदे हायस्कूलचे डी. व्ही. चव्हाण व मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.
वि. दि. शिंदे हायस्कूलचे यशगडहिंग्लज : राज्य शिक्षण परिषदेतर्फे झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत येथील वि. दि. शिंदे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. आठवीतील सहा विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीस तर २४ विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. अनघा लाटकर, कल्पना चिगरी, श्रावणी बागडी, संकेत शिरगावे, समर्थ नारे, समर्थ पाथरवट या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. प्रत्येकी १२ हजार रुपये याप्रमाणे पाच वर्षात ६० हजाराची शिष्यवृत्ती मिळणार आहे. मुख्याध्यापक डी. व्ही. चव्हाण यांचे प्रोत्साहन तर एस. बी. गाडीवड्ड, एस. एस. खोराटे, जे. एम. भदरगे, पी. वाय. पवार, के. ए. पुजारी यांचे मार्गदर्शन मिळाले.——————-00248अवधूत पाटील
अवधूत पाटील युवासेनेचे अध्यक्षगडहिंग्लज : येथील अवधूत पाटील यांची जिल्हा युवासेना (उद्धव ठाकरे) अध्यक्षपदी निवड झाली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. पाटील यांच्याकडे कागल, चंदगड व राधानगरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. या निवडीसाठी वरुण सरदेसाई, अविनाश बलकवडे, डॉ. सतीश नरसिंग, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांचे सहकार्य मिळाले. ——————-पालिकेतर्फे शनिवारी शाहूंना मानवंदनागडहिंग्लज : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाची सांगता सोहळा ६ ते १४ मेपर्यंत होणार आहे. येथील नगरपरिषदेतर्फे शनिवारी (ता. ६) सकाळी दहा वाजता शंभर सेकंद आहे त्या ठिकाणी स्तब्धता पाळून नागरिकांनी लोकराजाला आदरांजली वहावी, असे आवाहन मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी केले आहे. शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यात सर्वत्र वर्षभर विविध उपक्रमातून राजांच्या कार्याला उजाळा दिला आहे. या सोहळ्याचा सांगता कार्यक्रम शनिवारपासून सुरु होणार असून त्या दिवशी ही मानवंदना द्यायची आहे.