Archives

परिते गर्भलिंग निदानप्रकरणी आणखी तीन एजंट गजाआड

कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणी एजंटांची मोठी साखळी उघडकिस येत आहे, आणखी तीन एजंटांना करवीर पोलिसांनी अटक केली. दीपक केरबा शेडे (वय ३५ रा. दारवड, ता. भदरगड), गणेश साताप्पा डवरी (वय ३७ रा. घोटवडे, ता. करवीर), रणजित महादेव मुडे-पाटील (वय ४२ रा. बर्गेवाडी, ता. राधानगरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणी पोलिसांनी गतीने तपास सुरू केला असून आतापर्यत सूत्रधार कथित डॉक्टर राणी मनोहर कांबळे, महेश पाटील यांच्यासह एकूण नऊ जणांना अटक झाली आहे. परिते (ता. करवीर) येथे दि. १८ जुलै रोजी करवीर पोलिसांनी छापा टाकून बेकायदा गर्भलिंग निदानप्रकरणी छापा टाकून राणी कांबळे, महेश पाटील, घरमालक साताप्पा खाडे, गर्भलिंग निदानासाठी आलेल्या महिलेचा पती अनिल माळी, एजंट भारत जाधव, एजंट सचिन घाटगे यांना अटक केली होती. त्यापैकी राणी कांबळे व महेश पाटील यांना पोलीस कोठडीत वाढ देण्यात आली आहे, तर पोलिसांनी दीपक शेडे, गणेश डवरी, रणजित मुडे या तिघां एजंटांनी अटक केली. त्यामुळे बेकायदा गर्भलिंग निदान करण्यासाठी कमिशनवर एजंट नेमले होते. ही एजंटांची मोठी साखळी उघडकिस येत आहे. फोटो नं. २९०७२०२१-कोल-दीपक शेडे (आरोपी)फोटो नं. २९०७२०२१-कोल-गणेश डवरी (आरोपी)फोटो नं. २९०७२०२१-कोल-रणजित मुडे (आरोपी)29072129kol_10_29072021_5.jpg~29072129kol_11_29072021_5.jpg~29072129kol_12_29072021_5.jpgफोटो नं. २९०७२०२१-कोल-दीपक शेडे (आरोपी)फोटो नं. २९०७२०२१-कोल-गणेश डवरी (आरोपी)फोटो नं. २९०७२०२१-कोल-रणजीत मुडे (आरोपी)~फोटो नं. २९०७२०२१-कोल-दीपक शेडे (आरोपी)फोटो नं. २९०७२०२१-कोल-गणेश डवरी (आरोपी)फोटो नं. २९०७२०२१-कोल-रणजीत मुडे (आरोपी)~फोटो नं. २९०७२०२१-कोल-दीपक शेडे (आरोपी)फोटो नं. २९०७२०२१-कोल-गणेश डवरी (आरोपी)फोटो नं. २९०७२०२१-कोल-रणजीत मुडे (आरोपी)Open in app

Comments

mood_bad
  • No comments yet.
  • Add a comment
    • No products in the cart.