Source: Sakal Kolhapur
03321पन्हाळा : मोरोपंत ग्रंथालय इमारत.03322पन्हाळा : ग्रंथायलात असलेले कविवर्य मोरोपंत यांच्या हस्ताक्षराचा नमुना.
पन्हाळ्याचे मोरोपंत ग्रंथालय @ ६५आनंद जगताप : सकाळ वृत्तसेवापन्हाळा, या. ४ : पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर अवघ्या पाच वर्षांत स्थापन झालेले कविवर्य मोरोपंत ग्रंथालय उद्या (ता. ५) ६५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या ६४ वर्षात या ग्रंथालयाची उत्तरोत्तर प्रगती होत असून स्थानिकांसह बाहेरच्या अनेक वाचकांना या ग्रंथालयाचा लाभ झाला आहे, त्यांच्या वाचनात भर पडली आहे, अनेकांना येथील पुस्तकांमुळे नोकऱ्या मिळाल्या आहेत.पन्हाळा नगरपरिषदेच्या कविवर्य मोरोपंत ग्रंथालय वाचनालयाची स्थापना ५ मे १९५९ रोजी झाली आहे. कविवर्य मोरोपंत रामचंद्र पराडकर यांचा जन्म पन्हाळगडी १७२९ साली ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणी या इमारतीचे उद्घाटन मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले.मोरोपंतांचे वडील रामचंद्र हे मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील सौंदळ या गावचे. सन १७०९ ते १७८२ या काळात कोल्हापूर दरबार पन्हाळगडी भरत असल्याने रामचंद्रपंत मुजुमदार यांच्याकडे चाकरीसाठी येथे आले. त्यांच्याबरोबर त्यांच्या नातलगांपैकी गणेश पाध्ये आणि केशव पाध्ये हे दोघे बंधू येथे आले. मोरोपंतांचे संस्कृत आणि अन्य सर्व शिक्षण पाध्ये यांच्याकडे झाले. शिक्षण संपल्यानंतर त्यांनी कोल्हापूर संस्थानात कारकून म्हणून काम केले. पण नोकरीत ते रमले नाहीत, त्यांनी नोकरी सोडून लिखाणास सुरुवात केली. त्यांनी बहुतेक काव्ये मराठीत लिहिली आहेत. हे ग्रंथालय त्यांच्या स्मृती जपत आहे.या वाचनालयाला गो. नि. दांडेकर, ग. दि. माडगुळकर, ना. सि. फडके, मालती दांडेकर, कमल फडके, श्रीपाद शास्त्री जेरे, दयानंद बांदोडकर, भा. द. खेर, मृणाल गोरे, ब्रिगेडियर ग. शं. काळे आदींनी भेटी दिल्या आहेत.———–चौकटग्रंथपालपद २०१४ पासून रिक्तया वाचनालयात राज्य आणि लोकसेवा आयोगाच्या अभ्यासासाठी मुले मुली येतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु येथील ग्रंथपालपद २०१४ पासून रिक्त आहे. शोभा भिलावे इचार्ज म्हणून येथे काम पहात आहेत, त्यांच्या जोडीला शिपाई ही नाही.————-दृष्टिक्षेपात- २५ हजार ७६३ पुस्तके – २२ दैनिके- ४६ मासिके- पाच पाक्षिके- १७ साप्ताहिके