Archives

नृसिंहवाडीत मंदिर बंद असूनही भाविकांची गर्दी

नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे दत्तक्षेत्र महाराष्ट्रासह इतर राज्यात श्री दत्ताची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. यामुळे या ठिकाणी भाविकांची गर्दी कायम असते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंदिरे दर्शनासाठी बंद असले तरी श्री दत्तप्रभूंची राजधानी असल्याने भाविक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी भाविकांना मास्क व सॅनिटायझरची सक्ती करण्याची गरज आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून लसीकरणाचा वेगदेखील वाढला आहे. त्यामुळे शासनाने प्रवासाला, व्यापाऱ्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक दत्तभक्त श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मंदिराचे दर्शन बंद असले तरी दत्ताची राजधानी म्हणून या क्षेत्राला भेट देत आहेत. त्यामुळे येथील व्यापाराला थोडीफार का होईना चालना मिळत आहे. या ठिकाणी पुरोहितांची संख्या जास्त असून येथे धार्मिक विधीसाठी भाविक हजेरी लावत आहेत. मात्र सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून तिसरी लाट येऊ नये यासाठी व या ठिकाणी येणाऱ्या भाविकांमुळे संक्रमण होऊ नये मास्कची सक्ती करणे गरजेचे आहे. सध्या सॅनिटायझर व मास्कच्या वापराकडे दुर्लक्ष होत असून प्रशासनाने यात लक्ष घालणे गरजेचे आहे.Open in app

Comments

mood_bad
  • No comments yet.
  • Add a comment
    • No products in the cart.