Source: Sakal Kolhapur
00138 दिलखुश तांबोळी, 00139 विनायक शिंदे
दिलखुश तांबोळी, विनायक शिंदे यांची निवड कोल्हापूर : अखिल भारतीय आयुर्वेद संमेलनच्या जिल्हाध्यक्षपदी वैद्य दिलखुष तांबोळी, सचिवपदी वैद्य विनायक शिंदे यांची निवड झाली. महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाच्या शिर्डी येथे झालेल्या पदग्रहण समारंभात या निवडी घोषित केल्या. संस्थेचे आधारस्तंभ देवेंद्रजी त्रिगुणा यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्य राकेशजी शर्मा संस्थेचे अध्यक्ष आहेत. वैद्य एस. एन. पांडे प्रधानमंत्री आहेत. भविष्यात सर्वांच्या सहकार्याने आयुर्वेद प्रचार, प्रसाराचे कार्य महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन करणार आहे, असे तांबोळी, शिंदे यांनी सांगितले….दशभुजा गणेश दर्शनाचा दुर्मिळ योग आज कोल्हापूर : पुष्टीपती विनायक जयंती ५ मे रोजी आहे. पुष्टीपती विनायक जयंती दिवशी दशभुजा गणेश म्हणजे दहा हात (भुजा) असलेल्या गणपतीचे दर्शन घेणे. पुष्टीपती स्त्रोत वाचन करण्याला महत्व आहे. राजयोग, लक्ष्मीयोग, पोर्णिमा योग यांचे तिन्हीच्या एकाच योगावर येणारा वर्षातील दुर्मिळ योग म्हणजे पुष्टीपती विनायकी होय. या गणपतीचे दर्शनाचा योग शुक्रवारी (ता.५) पहाटे चारपासुन ते रात्री १२ पर्यंत आहे. दशभुजा गणपती क्वचितच आढळतो. नेपाळ, नाशिक, बेळगांव, पुण्यानंतर शाहुपूरी सात गल्लीमध्ये श्री पंचमुखी, दशभुजा गणेशमूर्ती आहे, अशी माहिती अध्यक्ष सुनील पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली. …‘प्रिन्सेस पद्माराजे’मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा कोल्हापूर : महापालिकेच्या प्रिन्सेस पद्माराजे विद्यालय क्रमांक २३ या ठिकाणी २०२३-२४ शैक्षणिक वर्षात दाखल झालेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित केला. शाळेतर्फे शाळा पूर्वतयारी किट, वही, खाऊ, लेखन सरावासाठी नवनीत लेखन पुस्तिका देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना विविध रंगांच्या कागदी टोप्या घातल्या. पालक पूजा सारंधर यांच्यामार्फत सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वितरित केल्या. मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, नेहरू हायस्कूलचे मुख्याध्यापक काझी, पद्माराजे विद्यालयाचे मुख्याध्यापक अमित जाधव, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष करिष्मा अत्तार, शिक्षक वसीम नायकवडी, स्नेहा पाटील, रेश्मा उमराणी, दुल्हनबी सुभेदार, रेश्मा अत्तार, आलिषा उमराणी, शबाना मुजावर, सायरा मुजावर, सेवक बाबासो कांबळे उपस्थित होते….