Source: Sakal Kolhapur
वाचू आनंदे, जगू आनंदेज्ञानार्जनासह मानसिकता विकसित करण्याचाही प्रभावी मार्ग ओंकार धर्माधिकारी ः सकाळ वृत्तसेवाकोल्हापूर, ता. ५ ः वाचन हा केवळ ज्ञानार्जनाचा मार्ग नाही, तर तो आपली मानसिकता विकसित करण्याचा एक उपायही आहे. वाचनातून मनाची एकाग्रता, संयम आणि नवनिर्मिती करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे विद्यार्थी दशेपासूनच वाचनाची आवड विकसित होणे आवश्यक आहे.आजची पिढी पुस्तके वाचत नाही, त्यांना वाचनाचा कंटाळा येतो, असा सूर उमटत असतो; पण काय आणि कसे वाचायचे? वाचनाने जगण्यात कसा बदल होतो? याबद्दल फारशी माहिती कोणी देत नाही; मात्र संशोधकांनी केलेल्या प्रयोगातून सततच्या वाचनातून केवळ मनोरंजन किंवा ज्ञानर्जन होते असे नाही, तर वाचनातून आपली मानसिकता घडत असते. त्यातून आपण आपले जगणे समृद्ध करू शकतो. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः वाचनाची आवड जोपासली पाहिजे. एक मानसिक उपचार पद्धत म्हणूनही वाचनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. वाचनातील वैविध्यामुळे आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो. सध्या विद्यार्थी सोशल मीडिया आणि विविध प्रकारच्या डिजिटल उपकरणात व्यस्त आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होत आहे. यातून विद्यार्थ्यांची सुटका करायची असल्यास वाचन हा सर्वांत चांगला, सोपा आणि प्रभावी उपाय असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे.
कोटथोर व्यक्तींची चरित्रे वाचली की, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तयार होतो. जीवनातील सकारात्मकता वाढते. चौफेर वाचन केल्यास विविध क्षेत्रांतील माहिती कळते. व्यक्तिमत्त्व विकासाला मदत होते. पालकांनी वाचनाची आवड जोपासली की, ती मुलांत अपोआप विकसित होते. यासाठी घरामध्ये पुस्तके आणून वाचणे आवश्यक आहे.- नमिता खोत, माजी संचालक, बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत केंद्र, शिवाजी विद्यापीठ.
कोटवाचन केल्याने सकारात्मक मानसिकता तयार होते. ज्ञान व माहिती मिळते. एकाग्रता, संयम वाढतो. पेज मेमरी वाढण्यास मदत होते. याचा लाभ विद्यार्थ्यांना होतो. त्यामुळे प्रत्येकाने रोज किमान काही वाचन केले पाहिजे. – डॉ. अश्विन शहा, मानसोपचारतज्ज्ञ. ——–वाचनाचे फायदे-विविध विषयांची माहिती होते-ज्ञानात भर पडते -एकाग्रता, संयम वाढतो -स्मरणशक्ती चांगली होते-विचार करण्याची पद्धत सकारात्मक होते -नवनिर्मिती करण्याची क्षमता विकसित होते -स्वतःचे विचार आत्मविश्वासाने मांडता येतात -वैचारिक प्रगल्भता येते ———हे आवश्यक- रोज वर्तमानपत्रांचे वाचन करा – आवडत्या लेखकाची, विषयांची पुस्तके वाचा- एका जागी बसून वाचन करा – वाचताना महत्त्वाचे मुद्दे नोंदवून ठेवा – पुस्तकांची कुटुंबीयांबरोबर चर्चा करा- पुस्तकातील लेखनाचा मतितार्थ समजावून घ्या