Source: Sakal Kolhapur
नानीबाई चिखलीत बुद्ध जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमनानीबाई चिखली : तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त येथील पंचशीलनगरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. ४) मे रोजी सकाळी ९ वाजता आजी माजी सैनिक असोसिएशनतर्फे ध्वजवंदन, त्रिशरण, प्रतिमा पूजन व बुद्धवंदना होणार आहे. १० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली यांच्या सौजन्याने आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन सरपंच यांचे हस्ते होणार आहे. सायंकाळी ५ वाजता १ ली ते ५ वी व ६ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत. शुक्रवारी (ता. ५) सकाळी १० वाजता विविध फनी गेम्स होणार आहेत. त्यानंतर रात्री ८ वाजता युवा व्याख्याते जितेंद्र लोकरे यांचे शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.