Source: Sakal Kolhapur
gad28.jpg00052गडहिंग्लज : नगरपरिषद व गडहिंग्लज कला अकादमीतर्फे आयोजित बालनाट्य शिबिराच्या समारोप प्रसंगी डॉ. सतीश साळुंखे, सिद्धार्थ बन्ने, प्रा. शिवाजी पाटील उपस्थित होते.——————————नाटक सामाजिक परिवर्तनाचे माध्यमडॉ. सतीश साळुंखे; गडहिंग्लजला बालनाट्य शिबिराचा समारोपसकाळ वृत्तसेवागडहिंग्लज, ता. २ : माणूस बदलत गेला तशी कलेची संकल्पनाही बदलत गेली. रंगभूमीला रंगभूमी न म्हणता रणभूमी असे म्हटले पाहिजे. कारण ही विचारांची भूमी आहे. नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे. त्यामुळे नाटकातून प्रस्थापित व्यवस्थेसमोर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, असे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त लेखक दिग्दर्शक डॉ. सतीश साळुंखे यांनी व्यक्त केले.येथील नगरपरिषद आणि गडहिंग्लज कला अकादमीतर्फे मोफत बालनाट्य शिबिराचे आयोजन केले होते. त्याच्या समारोपप्रसंगी डॉ. साळुंखे बोलत होते. सिद्धार्थ बन्ने अध्यक्षस्थानी होते. डॉ. साळुंखे म्हणाले, ‘सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या उपेक्षित असलेल्या लोकांबद्दल नाटकातून बोलले पाहिजे. अन्यथा नाटक व्यर्थ म्हणावे लागेल. नाटकातून सामाजिक विचार उभा राहिला पाहिजे.’ कला अकादमीचे अध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. समृद्धी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सरोज शिंदे यांनी आभार मानले. डॉ. निलेश शेळके, किरण चव्हाण, डॉ. संभाजी जगताप, उर्मिला कदम, अरुण पाटील, सारिका पाटील, संतोष देसाई, प्रशांत बाटे यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. दरम्यान, शिबीर तीन दिवस चालले. यात ३५ बालकलाकारांनी सहभाग घेतला होता. डॉ. साळुंखे यांनी अभिनय, नाट्यतंत्र, कल्पनाशक्ती, नाटक समजून घेण्यासाठी विविध खेळ, वाचिक अभिनय याबाबत मार्गदर्शन केले.