Source: Sakal Kolhapur
नगररचना विभागातर्फे गुंठेवारीसाठी विशेष कॅम्पकोल्हापूर, ता. ४ : गुंठेवारी विकास अंतर्गत परवानगीच्या कामासाठी नगररचना विभागाने दोन दिवसांच्या विशेष कॅम्पचे आयोजन केले आहे. १० व ११ मे रोजी नगररचना विभागामध्ये १० ते ६ वेळेत त्याचे आयोजन केले आहे. यामध्ये गुंठेवारी परवानगी प्रकरणांना मंजुरी दिली जाणार आहे. संबंधीत अर्जदार, मिळकतधारक, आर्किटेक्ट, इंजिनियर यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नगररचना विभागाने केले आहे.