Source: Sakal Kolhapur
धोपेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी कमी पडू देणार नाही : विनय कोरेशाहूवाडी, ता. ५ : कासार्डे (ता. शाहूवाडी) येथील स्वयंभू व ऐतिहासिक धोपेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन आमदार विनय कोरे यांनी दिले.कासार्डे येथील धोपेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी विनय कोरे यांच्या विशेष विकास निधीतून दोन कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतील बांधकाम प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. ‘गोकुळ’चे संचालक कर्णसिंह गायकवाड म्हणाले, ‘‘अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिराचे जीर्णोद्धार होतोय, हे महत्त्वाचे आहे. आमदार कोरे यांच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाला अधिकच गती प्राप्त झाली आहे.’’सभापती सर्जेराव पाटील म्हणाले, ‘‘विरोधकांनी तालुक्यात विकास केलाच नाही. उलट विकासकामाला विरोध करण्याचे काम केले. विकासापेक्षा विरोधालाच महत्त्व दिले.’’कार्यक्रमास माजी पोलिस उपअधीक्षक बाजीराव पाटील, बाबासो लाड, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, शुभलक्ष्मी कोरे, पंडित नलवडे, बाळासाहेब गद्रे, महादेवराव पाटील, विष्णू पाटील, अमर खोत, रंगराव खोपडे, राजू केसरे, बबन पाटील, नानासो तोलके, तुकाराम पाटील, सुनील पाटील, आनंदा पाटील उपस्थित होते. दत्ताराम भिलारे यांनी स्वागत केले. दिलीप सबनीस यांनी आभार मानले.