Source: Sakal Kolhapur
सत्यशोधक विश्व धम्म परिषद रविवारी
कोल्हापूरः धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने रविवारी (ता.७) सत्यशोधक विश्व धम्म परिषद होणार आहे. सिने अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. येथील शाहू स्मारक भवनात सकाळी ११ वाजता परिषद सुरू होईल. देशभरातील एक हजारांवर प्रतिनिधी परिषदेला उपस्थित राहतील, अशी माहिती ॲड. करूणा बिमल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. डॉ. मिलिंद आव्हाड, पिपल्स रिपब्लिकनचे राष्ट्रीय नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, भन्ते आर. आनंद, एस. संबोधी थेरो यांचे मार्गदर्शन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ धम्म अभ्यासक विजया कांबळे यांना धम्मसंगिती जीवनगौरव पुरस्कार, तर डॉ. शंकर अंदानी यांना सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट ब्रॅण्ड आॅफ महाराष्ट्रचा जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. धम्म लिपीच्या अभ्यासक छाया पाटील स्वागताध्यक्ष आहेत. सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होतील.