Archives

दोघा सराईत चोरट्यांना अटक

इचलकरंजी : कोंडिग्रे (ता. शिरोळ) फाट्यावर एका हॉटेलजवळ चोरीतील सोन्याचे दागिने विक्रीसाठी चोरटे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ३१.५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १७२ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि इतर साहित्य असा १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.रेकॉर्डवरील गुन्हेगार अस्लम मेहबूब सनदी (वय २८, मूळ गाव अथणी, जि. बेळगाव. सध्या रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) व इजाज मेहमुद्दीन मकानदार (३२, रा. संगमनगर-तारदाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अस्लम हा कर्नाटक पोलिसांच्या रेकॉर्डवरील दिवसा घरफोडी, चोरी करणारा गुन्हेगार आहे. त्याच्यावर कर्नाटकातील अथणी, कागवाड, चिकोडी, गांधी चौक व विजापूर या पोलीस ठाण्यांत चोरीचे सोळा गुन्हे दाखल आहेत. या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता दानोळी (ता. शिरोळ) व शहापूर (ता. हातकणंगले) या दोन ठिकाणी तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली. तसेच यापूर्वी चोरलेल्या दागिन्यांपैकी ५५ ग्रॅम वजनाचे व एक लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रामदुर्ग (कर्नाटक) येथील आयसीआय बॅँक व मनप्पूरम गोल्ड लोन येथे तारण ठेवल्याचे सांगितले. हे दागिने जप्त करण्याची कारवाई सुरू आहे.फोटो ओळी२४०९२०२१-आयसीएच-०९स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघा सराईत चोरट्यांना अटक करून चोरीचे दागिने जप्त केले.Open in app

Comments

mood_bad
  • No comments yet.
  • Add a comment
    • No products in the cart.