22-10-2020
श्रीगणेश सांगतात की आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. तब्बेत बिघडेल. मन चिंताग्रस्त राहील. घरातील व्यक्तींशी पटणार नाही. त्यामुळे घरात शांतता राहणार नाही. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. पाण्यापासून भीती आहे. सबब जलाशयाच्या ठिकाणी दुस्साहस करू नका. स्थावर मालमत्ता, वाहन इ. संबंधीच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी पूर्ण विचार करा.