Source: News18 Lifestyle
मुंबई, 5 जून: आज दिनांक ५ मे २०२३ .वार सोमवार .आज ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा/ द्वितीया . आज चंद्र धनु राशीत भ्रमण करेल. श्री गणेशाचे स्मरण करून पाहूया बारा राशींचे राशी भविष्य.
मेष
आज चंद्र भ्रमण भाग्य स्थानात होणार असून संततीला लाभ होतील. घर आणि वैवाहिक सुख मिळेल. घरात जास्त काम पडेल. राशीत असलेला गुरू तेज आणि आरोग्य प्रदान करेल. दिवस शुभ आहे.
सावधान! घरात पक्षी पाळण्याचा विचार करत असाल तर वास्तुशास्त्राचा हा इशारा
वृषभ
अष्टम स्थानातील चंद्र आणि शुक्र मंगळ भ्रमण भावंडांशी वाद दर्शवित आहे. प्रवास होईल. शनि कर्म स्थानी आहे नोकरीमध्ये काळजी घ्या. कार्यालयीन कामात जागरूक रहा . व्यय राहू कायद्याचे बंधन पाळा असे सुचवीत आहे.. चांगला दिवस.
मिथुन
राशी स्वामी बुध व्ययस्थानात असून कार्यालयीन बाबीत कायद्याचे पालन करा. आरोग्य मध्यम राहील. लाभ स्थानातील ग्रह मित्र भेट घडतील. वैवाहिक सुख मिळेल. दिवस मध्यम
कर्क
राशीच्या षष्ठ स्थानात चंद्र व्यवसायाला प्राधान्य द्या असे सांगत आहे. सामाजिक जीवन उत्तम राहिलं. वैवाहिक सौख्य कमी मिळेल. आरोग्य आणि आर्थिक बाजू जपा.
दिवस शुभ.
सिंह
आज चंद्र पंचम स्थानात असून घर आणि संतती दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल .धर्म आणि पूजा पाठ यात आस्था वाढेल.व्यय मंगळ शुक्र आर्थिक दृष्ट्या कठीण. मध्यम दिवस.
कन्या
मातृ पितृ चिंता संभवते. दिवस मध्यम असून चतुर्थ स्थानात चंद्र घराकडे लक्ष द्या असे सांगत आहेत नोकरी निमित्त प्रवास होतील. संतती कष्ट देइल..दिवस मध्यम.
तुला
एक बरा दिवस असून केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल .वरिष्ठ कामाची दाखल घेतील. वैवाहिक जीवनासाठी शुभ योग असून आनंदाचे वातावरण राहील. प्रवास योग येतील. कर्ज मुक्ती होईल. दिवस शुभ .
वृश्चिक
आज द्वितीय चंद्र भ्रमण आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात बाहेर आणेल. व्यवसाय व आरोग्य उत्तम राहिलं. मंगळ शुक्र धार्मिक बाबीत खर्च होतील. दिवस मध्यम.
धनु
चंद्र राशीस्थानात शुभ फळ प्रदान करीत आहे .आनंदी राहण्याचा दिवस आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. प्रवास होतील. आर्थिक, व्यावसायिक आणि प्रकृतीच्या बाबत उत्तम दिवस.
मकर
जपून राहण्याचा दिवस आहे. वैवाहिक जीवन मध्यम राहील. प्रवास होतील. आर्थिक, व्यावसायिक आणि प्रकृतीच्या बाबत काळजी घ्या. मित्र भेट होईल. दिवस बरा .
कुंभ
आज व्यवसायाला वेळ देऊन आपल्या दिवसाची सुरवात करा. प्रवासा साठी खर्च होईल . पण नवीन खरेदी मौजमजा करण्यात दिवस जाईल. आर्थिक दृष्टया शुभ दिवस. व्यवसायासाठी दिवस बरा आहे.
मीन
आज दिवस सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टया चांगला आहे .व्यवसाय नोकरीसाठी शुभ. चंद्र दशम स्थानात असून आर्थिक हालचाली दाखवीत आहे. शत्रू पासून सावध राहा. वैवाहिक सुख उत्तम मिळेल. दिवस चांगला.
शुभम भवतू!!