Archives

दानोळीतील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले

यावेळी सांगले यांनी गट नंबर ११५७ वरील झालेला घोळ सांगण्याचा प्रयत्न केला. पण नायब तहसीलदार काटकर यांनी आम्हाला मिळालेल्या आदेशानुसार आम्ही आमचे काम पूर्ण करत आहोत स्पष्ट केले. तसेच शासकीय कामात अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे मंडल अधिकारी संजय सुतार यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपूर्वीपासून आनंदा-सांगले कुटुंबातील हा रस्ता वादात अडकला होता. हा रस्ता खुला करण्यासाठी गेल्या महिन्यात प्रशासन पोलीस बंदोबस्तात आले होते. यावेळी सांगले कुटुंबातील एका महिलेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला व एकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनास माघारी परतावे लागले होते. या रस्त्याच्या वादाबाबत तक्रार व दावे तहसीलदार, प्रांताधिकारी व न्यायालयात तसेच मुंबई उच्च न्यायालयातही पोहोचले आहेत. यावेळी तलाठी शैलेश कोईगडे, कोतवाल अकबर मुलानी, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ, महादेव कोळी, सागर मगदूम, गुलाब सनदी, सागर सूर्यवंशी, पल्लवी चव्हाण, प्रियांका कदम, शशिकांत भोसले, विजय पाटील, रोहित डावाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.फोटो – २४०९२०२१-जेएवाय-०५फोटो ओळ – दानोळी (ता. शिरोळ) येथील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली.Open in app

Comments

mood_bad
  • No comments yet.
  • Add a comment
    • No products in the cart.