Source: Sakal Kolhapur
संशयिताकडून चार लाखांचा मुद्देमाल जप्त
जयसिंगपूर: उतारा टाकण्याच्या बहाण्याने निमशिरगाव (ता. शिरोळ) येथून ३ लाख ९६ हजार ८०० रुपयाच्या ऐवजावर डल्ला मारलेल्या संशयिताकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. संशयित आरोपी रेश्मा उर्फ महमदहनिफ हुसेनसाब शेख (वय ५४, रा.कुडची, ता.अथणी, सध्या रा.मंगसुळी, ता.कागवाड) याला पोलिसांनी सहा दिवसांपूर्वी अटक केली होती. १५ मे रोजी मिरासो बागसार यांच्या घरातून संशयित आरोपी शेख याने सोन्याचे दागिने, रोकड असा सुमारे ४ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचा संशय होता.