Source: Sakal Kolhapur
दयावान ग्रुपतर्फे क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव
कोल्हापूर, ता. ३ ः साकोली कॉर्नर येथील आझाद हिंद तरुण मंडळ प्रणीत दयावान ग्रुपतर्फे वर्धापनदिनानिमित्त कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. ६) दुपारी तीन वाजता मोटारसायकलबरोबर म्हैस पळवणे, चारला म्हशींच्या स्पर्धा होतील. सहा वाजता लहान मुलांसाठी संगीत खुर्ची आणि आठ वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा होतील.रविवारी (ता. ७) सकाळी दहाला रक्तदान शिबिर होणार असून, अकरा वाजता स्केटिंग स्पर्धा, साडेअकराला मिनी मॅरॅथॉन आणि त्यानंतर लिंबू-चमचा स्पर्धा होतील. सायंकाळी सहाला महिलांसाठी संगीत खुर्ची, स्पॉट गेम स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि आठ वाजता मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम होईल. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रुपने केले आहे.