Source: Sakal Kolhapur
दफन केलेला मृतहेह बाहेर काढून शवविच्छेदनकुरुंदवाड ता.२ः दफन केलेला मृतदेह बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन करण्याचा प्रकार आज हेरवाड (ता.शिरोळ) येथे घडला. पोलिस प्रशासन व नायब तहसिलदारांच्या उपस्थितीत शवविच्छेदन झाले. अमीर बालेचॉंद नदाफ (वय ३०) असे शवविच्छेदन झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, हेरवाड (ता. शिरोळ) येथील अमिर बालेचांद नदाफ या तरुणाचा शनिवारी (ता. ३०) रोजी कोगनोळी (ता. मिरज) येथे मृत्यू झाला होता. आकस्मिक मृत्यू झाल्याचे समजून नातेवाईकांनी हेरवाड येथील मुस्लिम दफनभूमीत दफन केले. मात्र त्याच्या मृत्यूबाबत संशय आल्याने पत्नी फातिमा यांनी कवठेमहांकाळ (ता. मिरज) पोलिस ठाण्यात तक्रार केली.त्यांनी मृत्यूबाबत शंका उपस्थित केली.त्यामुळे पोलिसांनी आज (ता.२) दुपारी दफनभूमी केलेले मृतदेह काढून शवविच्छेदन केले.