Archives

दत्त ग्राहक संस्थेच्या सभासदांना लाभांश

गणपतराव पाटील : ३९ वी वार्षिक सभाशिरोळ : येथील श्री दत्त ग्राहक संस्थेची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. २०२०-२१ या सालासाठी सभासदांकरिता दहा टक्के प्रमाणे लाभांश वस्तू रुपाने येत्या दीपावलीत देण्यात येणार असल्याची माहिती उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली. येथील श्री दत्त साखर कारखाना संस्थेच्या सभागृहात ऑनलाईन सभा झाली. यावेळी सर्व विषय मंजूर करण्यात आले. नोटीस वाचन शाखा व्यवस्थापक सदानंद घोरपडे यांनी केले. यावेळी दामोदर सुतार यांनी लॉकडाऊन काळात शासनाने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याच्या केलेल्या आवाहन प्रमाणे शासनाच्या निर्बंधाचे पालन करत संस्थेच्या सर्व सेवा सुरु ठेवल्या असल्याचे सांगितले. यावेळी गणपतराव पाटील यांचा विजयकुमार गाताडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्षा अनिता कोळेकर, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सुहास मडिवाळ, भाऊसो पाटील, दीपक ढोणे, शहाजान बाडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ. राजश्री पाटील यांनी आभार मानले.फोटो – २४०९२०२१-जेएवाय-०३फोटो ओळ – शिरोळ येथे दत्त ग्राहक संस्थेच्या वार्षिक सभेत उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले.Open in app

Comments

mood_bad
  • No comments yet.
  • Add a comment
    • No products in the cart.