डॉ. ए. डी. शिंदे कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्यूहला प्रतिसाद

Facebook
LinkedIn
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

gad29.jpg00048भडगाव : शिंदे इंजिनिअरिंगतर्फे आयोजित कॅम्पस इंटरव्यूहमध्ये कंपनीचे एच. आर. वसीम काझी यांचा सत्कार प्रा. किशोर जोशी यांनी केला. शेजारी हेमंत करिगार, अमित शेळके.———————————————-डॉ. ए. डी. शिंदे कॉलेजमध्येकॅम्पस इंटरव्यूहला प्रतिसादसकाळ वृत्तसेवागडहिंग्लज, ता. २ : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. शिंदे अभियांत्रिकी महाविद्यालयात चाकणच्या लुमॅक्स इंडस्ट्रीजतर्फे कॅम्पस इंटरव्यूह झाले. त्याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. यासाठी गडहिंग्लज, चंदगड, आजरा, भुदरगड, गारगोटी, बेळगाव परिसरातील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सचिव प्रा. स्वाती कोरी यांचे भाषण झाले. लेखी परीक्षा व त्यातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया झाली. शंभरहुन अधिक विद्यार्थी प्रक्रियेला सामोरे गेले. १४ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. किशोर जोशी यांनी दिली. यामध्ये डॉ. ए. डी. शिंदे इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी व कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कॉलेजचे ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. साजिद सोलापुरे व प्रा. महादेव बंदी यांनी नियोजन केले होते.

Marathi News
LATEST
>>कोल्हापूर : वेतवडे येथे धामणी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू>>कांदा झाला स्वस्त>>पेठवडगाव: अपघात जोड>>पोलीस कोठडी>>पिवळे सोने झाले मातीमोल>>युथ समिट ऑफ समर अधिवेशन>>सीपीआर रक्षकावर हल्ला गुन्हा दाखल>>Kolhapur : हत्तीवरून मिरवणुकीने कन्याजन्माचे स्वागत; पाटील कुटुंबीयांचा आदर्श उपक्रम>>लॉरी ऑपरेटर्स हेल्मेट>>नेते, संचालक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी>>मुश्रीफ कार्यक्रम>>नागोजीराव पाटणकर हायस्कूल बातमी>>ओबीसी आरक्षण वाढवण्याचा निर्णय चुकीचा ः ॲड.इंदुलकर>>‘आरसीसी-एसईटी’साठी रविवारी स्कॉलरशिप परीक्षा>>भाजप कार्यालय प्रवेश>>जंगम समाज संस्कार शिबीर>>मराठा महासंघ मेळावा>>झूम प्रकल्प पाहणी>>सौंदाळेच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू>>प्रकाशन
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: