Source: Sakal Kolhapur
डीआरके कॉमर्स कॉलेजमध्ये गुरुवारी आंतरराष्ट्रीय परिषद
कोल्हापूर ः येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स (डीआरके) येथे गुरुवारी (ता. ४) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि वाणिज्य विभागातर्फे आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. वाणिज्य, व्यवस्थापन, सामाजिक विज्ञान आणि मानव्यशास्त्र यातील आधुनिक विचार : एक बहुविद्याशाखीय दृष्टिकोन या विषयावरील परिषदेसाठी डॉ. परशराम पाटील, (सल्लागार एशियन विकास बँक, सल्लागार वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. सलाउद्दीन उमरखलील (अफगाणिस्तान), डॉ. नामदेव गवस (गोवा विद्यापीठ), डॉ. एस. बी. आकाश (राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव) मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी केले.