Source: Sakal Kolhapur
‘धूप तेज है, गाडी चलाते आराम कहा करें’ट्रकचालकांची हातबलता ः मालवाहतूक उन्हामुळे दिवसा बंद, रात्री सुरू
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा कोल्हापूर ,ता. २ ः ‘धूप तेज है, इसीलीये दिन के अलावा रात को गाडी चलाते हुए सुबह इधर आते है. गाडी खाली होणे तक रूकना पडेगा… ऐसे धूप में खाना बनायें कैसे, आराम करें कंहा, हरबार यही समस्या है… किसको बोलू, कौन सुनेगा, सुविधा कौन करेगा, इसीलीये जो जीस हालत मैं उसी हालत में काम चला लेते है…’ मार्केट यार्डात गुळ वाहतूक करणाऱ्या ट्रकचालक भोला मिश्रा या ट्रक चालकाने दिलेली प्रतिनिधीक प्रतिक्रिया. दिर्घपल्ल्याच्या माल वाहतूक करणाऱ्या चालकांची ही व्यथा. राज्यभरात उन्हाचा पारा ४० ते ४३ अंशावर चढला. अवजड मालाची वाहतूक उन्हामुळे दिवसा बंद रात्री सुरू होते. मात्र, शेतीमाल हा नाशवंत माल असल्याने आहे, तो वेळेत बाजारपेठेत पोहचवावा लागतो. सलग गाडी चालवावी लागते. अन्यथा माल खराब होतो. व्यापारी शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यानुसार कोल्हापूरात मार्केट यार्ड, गांधीनगर, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी व्यापारी भागात रोज शेकडो वाहने येतात. तेवढीच वाहने बाहेर जातात. गुळ, फळे, कांदा बटाटा यांचे ट्रक दिवस-रात्री प्रवास करतात. जवळपास ८०० ते १८०० किलो मीटरचा प्रवास होतो तेव्हा ट्रक सकाळी किंवा सायंकाळी येथे पोहचतात. १२ ते ४८ तास अवजड वाहन चालवल्यानंतर चालकांसाठी विश्रांतीची सुविधा नाही. यार्डात पाण्याची टाक्यांवर थंड पाण्याची आंघोळ करून चालक- वाहक थांबतात. सकाळी अकरापासून ऊन तापते, केबीनमध्ये बसवत नाही. तोपर्यंत माथाडी कामगार दुपारी दोन वाजेपर्यंत गाडीतील पोती उतरतात. पुन्हा गाडी बाजूला घेऊन हॉटेलमध्ये जसं मिळेल तसं जेवण केलं जातं. तोपर्यंत दुपारीचे तीन वाजतात. गाडी पुन्हा शेतीमाल भरून दुसऱ्यागावी जाणार असते. मात्र, हा शेतीमाल दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी भरणार असल्याने एक दोन रात्री येथे राहण्याची वेळ येते. डास चावतात, सुरक्षेअभावी रात्रीची झोप होत नाही. पचनक्रिया बिघडते. गलिच्छ स्वच्छतागृह वापरावे लागते. कपडे धुता येत नाहीत. यातून जडावलेले अंग व थकलेले मन घेऊन पुढील परतीचा प्रवास सुरू होतो.
———-चौकटभत्ता नको, सुविधा द्या…चालकांसाठी स्वतंत्र निवासी सुविधा देण्याशी व्यापारी वर्गाला घेणे-देणे नाही, बाजार समितीसह विविध असोसिएसन आमचा संबध नसल्याचे सांगतात. ट्रक मालक परजिल्ह्यात किंवा राज्यात असतो. चालकाला भत्ता पाचशे रूपये दिला की विषय संपला. अशा पराधीन स्थितीत हजारो ट्रक चालक माल वाहतूक करतात.
चौकट काय आहेत व्यथा?- डोळ्यात झोप घेऊन अवजड वाहन चालवावे लागते. – पदोपदी दुर्घटनेची चिंता घंटा मनात वाजते. – गैरसोयी वर्षानुवर्षे, त्यातच गाडी चालवावी लागते. – गैरसोयीच्या वेदनेत शरीर जिर्ण, मन शीण होतं – व्याधी ग्रासतात, कर्ता अंथरून धरतो – उपचार खर्चासाठी उदार उसणवार सुरू होते – ही स्थिती बदलण्यासाठी निवास व स्वच्छतागृह सुविधा हनी