Source: Sakal Kolhapur
00595कोल्हापूर ः महानगरपालिकेच्या क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या ओपन जिमबाबतच्या विविध मागण्यांचे निवेदन कोल्हापूर सर्व पक्षीय शहर अन्याय निवारण समितीच्या शिष्टमंडळाने गुरूवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांना दिले.
जुन्या ओपन जिम रंगवून नवे दाखविण्याचा प्रकार नकोसर्व पक्षीय समितीची मागणी; ‘सार्वजनिक बांधकाम’ला निवेदनसकाळ वृत्तसेवाकोल्हापूर, ता. ४ ः महानगरपालिका क्षेत्रात ओपन जिम आणि मुलांची खेळणी बसविण्याची सुमारे पाच कोटी रूपयांची कामे राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने निर्देशित केली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ही कामे केली जाणार आहेत. गरज असलेल्या आणि योग्य जागेत या जिम उभाराव्यात व खेळणी बसविण्यात यावीत. जुन्या जिम रंगवून नव्या असल्याचा दाखविण्याचे प्रकार घडणार याची दक्षता घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर सर्व पक्षीय शहर अन्याय निवारण समितीच्या शिष्टमंडळाने गुरूवारी दिला. त्याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांना दिले.शहरातील रंकाळा, मेरीवेदर मैदान, महावीर गार्डन, सिद्धाळा गार्डन अशा विविध ५१ ठिकाणी ओपन जिमची उभारणी, खेळणी बसविण्यासाठी शासनाने अनुदान देण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. कृती समितीच्या शिष्टमंडळाने सध्या शहरात चांगल्या स्थितीत असलेल्या ओपन जिमच्या ठिकाणी जावून त्यांची छायाचित्रे घेतली आहेत. त्यामुळे कार्यन्वित असलेल्या जिमच्या ठिकाणी पुन्हा पाच कोटी रूपये खर्च होवू नयेत याची दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी कृती समितीच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली. या जिम उभारणी, खेळणी बसविण्यात कोल्हापूरसह राज्यातील कोणत्याही महानगरपालिकेच्या क्षेत्रात भ्रष्टाचार झाल्यास तो समितीतर्फे उघड करण्यात येईल, असे समितीचे निमंत्रक दिलीप देसाई आणि ॲड. बाबा इंदुलकर यांनी सांगितले. या वेळी सार्वजानिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता वैभव जाधव, उपअभियंता महेश कांजर, कृती समितीचे अनिल कदम, महादेव पाटील, गीता हसूरकर, सुनिता पाटील, सुवर्णा मिठारी, सुधा सरनाईक, चंद्रकांत पाटील, आदी उपस्थित होते.——————-सर्व्हे करूनच जिम उभारावीयोग्य, रिकाम्या जागांच्या चर्तुसीमा, गुगल मॅपद्वारे फोटो घेवून आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समितीद्वारे सर्व्हे करूनच ओपन जिम उभारण्यात यावी, अशी मागणी कृती समितीने केली. त्यावर या मागणीनुसार कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता पाटील यांनी दिले असल्याचे दिलीप देसाई यांनी सांगितले.