Source: Sakal Kolhapur
जिल्हा परिषदेकडे अभ्यागतांची पाठ
कोल्हापूर: मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनामुळे संपूर्ण शहर ठप्प होते. याचा परिणाम सर्वत्र दिसून आला. एरव्ही मिनी मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषदेत लोकांची नेहमीच गर्दी होत असते. मात्र आज पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडे अभ्यागतांनी पाठ फिरवली. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दर आठवड्याची समन्वय बैठक घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यामध्ये पशुसंवर्धन विभागाला लम्पीच्या उपाययोजना प्रभावी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच याकामी गटविकास अधिकाऱ्यांना लक्ष घालण्याबाबत सांगण्यात आले. तसेच आरोग्य विभागाला झिका व्हायरस रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.