Source: Sakal Kolhapur
04660
चिपडे सराफ पेढीची योजना गुरुपुष्यामृतापर्यंत
कोल्हापूर, ता. २४ : भाऊसिंगजी रोडवरील गोपीनाथ अनंत चिपडे सराफ पेढीची ट्रिपल धमाका ऑफर गुरुपुष्यामृत मुहूर्तापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती पेढीचे ज्येष्ठ संचालक बन्सीधर चिपडे, मुरलीधर चिपडे यांनी दिली. भवानी मंडपाजवळील अद्ययावत शोरूमच्या तिसाव्या वर्धापनदिनानिमित्त चिपडे सराफांनी ट्रिपल धमाका ऑफर जाहीर केली होती. त्याअंतर्गत सर्व हॉलमार्क दागिन्यांच्या मजुरीत ३० टक्के सूट आणि जोडीला मंगळसूत्र महोत्सव असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद योजनेला लाभला. सोमवार (ता. २२) पर्यंत चाललेली ही योजना ग्राहकांच्या मागणीमुळे उद्या होणाऱ्या गुरुपुष्यामृत मुहूर्तापर्यंत सुरू राहणार आहे. गुरुपुष्य योग हा मुहूर्त सोने खरेदीसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे शकुनाच्या सोने खरेदीबरोबरच कमी वजनाचे कानातले, कान, चेन, अंगठी, ब्रेसलेट, चेन, पेंडन्ट सेट तसेच मंगळसूत्र महोत्सवात डिझायनर, अँटिक तसेच शॉर्ट मंगळसूत्र याची व्हरायटी पहायला मिळणार आहे. यानिमित्ताने, भरवश्याची गुंतवणूक आणि दागिन्यांच्या मजुरीत ३० टक्के सूट असा ग्राहकांचा फायदा होणार आहे. वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही योजना असून, ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पेढीचे युवा संचालक तुषार चिपडे, सिद्धार्थ चिपडे, पुष्कराज चिपडे यांनी केले.