Source: News18 Lifestyle
मुंबई, 18 मे : मासे हे सर्व प्रकारच्या पौष्टिक घटकांनी समृद्ध असलेले अन्न आहे. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, माशांच्या सेवनाने हृदयविकारासह अनेक आजारांचा धोका टळतो. माशांमध्ये प्रोटीन, ओमेगा 3 फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन डी आणि इतर पोषक तत्वांसह हेल्दी फॅट असते. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का? माशांच्या अतिसेवनामुळे कर्करोग देखील होऊ शकतो. पण एका अभ्यासात हा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
होय, कॅन्सर कॉज अँड कंट्रोल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, माशांचे जास्त सेवन केल्याने त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. जेव्हा हा अभ्यास झाला आणि संशोधकांनी दावा केला की, माश्यांमुळे कर्करोग होऊ शकतो, तेव्हा वैज्ञानिक जग आश्चर्यचकित झाले. कारण पोषणतज्ञही मासे खाण्याचा सल्ला देतात. तर दुसरीकडे सूर्यप्रकाश प्रामुख्याने त्वचेच्या कर्करोगासाठी जबाबदार आहे.
शरीराच्या कोपऱ्यात जमलेले कोलेस्टेरॉलही सहज बाहेर निघेल, फक्त रोज खा ही 5 फळं
अभ्यासाचा निष्कर्ष…
अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, जे लोक जास्त मासे खातात त्यांना मेलेनोमाचा धोका जास्त असतो. मेलेनोमा हा त्वचेच्या कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. हा अभ्यास अमेरिकेतील 6 राज्यांतील 50 हजारांहून अधिक लोकांवर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या अभ्यासात 1995 ते 1996 दरम्यान या लोकांना आरोग्याशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. यातील लोकांचे सरासरी वय ६१ वर्षे होते आणि ६० टक्क्यांहून अधिक पुरुष होते. त्यानंतर 15 वर्षे या लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले.
यानंतर संशोधकांनी यापैकी किती लोकांना मेलेनोमाचा त्रास सहन करावा लागला हे शोधून काढले. अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, त्वचेच्या कर्करोगाच्या 22 टक्के प्रकरणे आठवड्यातून 2.6 वेळा मासे खाणाऱ्या लोकांमध्ये आढळले. हाच परिणाम ट्युना मासळीच्या सेवनावरही दिसून आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेव्हा संशोधकांनी पाहिले की, जे लोक तळलेले मासे खातात, त्यांनी कितीही मासे खाल्ले तरी मेलेनोमाची प्रकरणे दिसली नाहीत.
हार्वर्ड मेडिकलने दिली ही माहिती
मग याचा अर्थ असा घ्यावा का की जास्त मासे खाल्ल्याने मेलेनोमा कॅन्सर होतो. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या वेबसाइटवर या अभ्यासाविषयी असे म्हटले आहे की, या अभ्यासातून कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे घाई करणे होईल. हा अभ्यास खूप मर्यादित आहे. सध्या यासाठी सविस्तर अभ्यासाची गरज आहे, ज्यामध्ये त्याचा पूर्ण तपास करता येईल.
50 नंतर जिमला न जाताही कमी होईल पोटाची जिद्दी चरबी! फॉलो करा तज्ज्ञांनी सांगितलेल्या या 7 टिप्स
हार्वर्ड मेडिकलने सांगितले की, अभ्यासातील लोकांनी सांगितले आम्ही आठवड्यातून इतके दिवस मासे खातो. परंतु ते खरे बोलत असतील याची शाश्वती नाही. मेलेनोमा होण्याची अनेक कारणे आहेत. कोणत्याही भागात राहणाऱ्या लोकांना जास्त मासे खाल्ल्याने त्वचेचा कर्करोग होऊ शकतो का, हेही पाहावे लागेल. माशांमध्ये घातक रसायने आहेत की नाही हेही अभ्यासात स्पष्ट झालेले नाही. उदाहरणार्थ मासे साठवण्यासाठी त्यात अनेक हानिकारक रसायने मिसळली जातात. त्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचे मुख्य कारण काय आहे हे सांगणे कठीण आहे.