जर ‘या’ खात्यात मोठ्या प्रमाणात जमा केल्या २ हजाराच्या नोटा तर तुम्हीही फसाल

Facebook
LinkedIn
WhatsApp
एका सरकारी बँकेच्या अधिकाऱ्यानुसार, आयकर विभागाकडून सर्व बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Source: Lokmat National

नवी दिल्ली – तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कुणाच्या नावाने जन-धन खाते उघडले असेल तर सतर्क राहा. जर या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात २ हजारांच्या नोटा जमा झाल्या तर आयकर खात्याच्या चौकशीच्या फेऱ्यात तुम्ही अडकण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, २ हजारांच्या काळ्या नोटा ठेवणारे जनधन खातेधारकाचा वापर करून बँकेत नोटा बदलू शकतात त्यासाठी या खात्यांवरही आयकर विभागाची नजर असणार आहे. 

खात्यात संशयस्पद व्यवहार झाल्यास बँक रिपोर्ट करणारएका सरकारी बँकेच्या अधिकाऱ्यानुसार, आयकर विभागाकडून सर्व बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. जनधन खात्यांवर विभागाची करडी नजर आहे. जर कुठल्याही जनधन खात्यात संशयास्पद व्यवहार झाले तर त्याचा रिपोर्ट आयकर विभागाकडे जाणार आहे. आयकर विभागाचे अधिकारी सतर्क राहिले असून जन धान खातेधारकांचा २ हजारांची नोट बदलण्यासाठी वापर होण्याची शंका विभागाला आहे. 

प्रामाणिक लोकांना त्रास देणार नाहीविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, जर कुणाच्या घरी २ हजारांच्या काही नोटा असतील आणि त्या बँकेत जमा करत असतील तर त्यांची चौकशी होणार नाही. परंतु जर कुणी गरीब अथवा जनधन खातेधारक मोठ्या प्रमाणात बँकेत २ हजाराची नोट जमा करत असेल तर त्याची चौकशी केली जाईल. या लोकांवर नजर ठेवण्यासाठी बँक, कर विभाग आणि तपास यंत्रणाचे अधिकारी अलर्टवर आहेत. 

मोहिमेतंर्गत जनधन खाते उघडले होतेसध्या देशात बहुतांश लोकांकडे जनधन खाते आहे. समाजातील सर्व लोकांना बँकिंग व्यवहाराशी जोडण्यासाठी काही वर्षापूर्वी जनधन खाते उघडण्याची मोहिम हाती घेतली होती. त्यामुळे देशातील अनेक गरीब कुटुंबातील प्रत्येकाकडे किमान १ जनधन खाते आहे. या खातेधारकांचा वापर स्वार्थासाठी करून काहीजण २ हजारांच्या नोटा बदलण्याचा प्रयत्न करतील अशी शंका अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे या खात्यांवर आयकर विभागाची करडी नजर आहे. 

Marathi News
LATEST
>>कोल्हापूर : वेतवडे येथे धामणी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू>>कांदा झाला स्वस्त>>पेठवडगाव: अपघात जोड>>पोलीस कोठडी>>पिवळे सोने झाले मातीमोल>>युथ समिट ऑफ समर अधिवेशन>>सीपीआर रक्षकावर हल्ला गुन्हा दाखल>>Kolhapur : हत्तीवरून मिरवणुकीने कन्याजन्माचे स्वागत; पाटील कुटुंबीयांचा आदर्श उपक्रम>>लॉरी ऑपरेटर्स हेल्मेट>>नेते, संचालक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी>>मुश्रीफ कार्यक्रम>>नागोजीराव पाटणकर हायस्कूल बातमी>>ओबीसी आरक्षण वाढवण्याचा निर्णय चुकीचा ः ॲड.इंदुलकर>>‘आरसीसी-एसईटी’साठी रविवारी स्कॉलरशिप परीक्षा>>भाजप कार्यालय प्रवेश>>जंगम समाज संस्कार शिबीर>>मराठा महासंघ मेळावा>>झूम प्रकल्प पाहणी>>सौंदाळेच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू>>प्रकाशन
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: