Source: Sakal Kolhapur
05340जयसिंगपूर : सर्वधर्मीय ईद मिलन कार्यक्रमात माजी खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गणपतराव पाटील, हाजी सिकंदर गैबान, खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष रुस्तमभाई मुजावर आदी उपस्थित होते. ———जयसिंगपूरला ईद मिलन उत्साहातजयसिंगपूर, ता. ३ : येथील खिदमत फाउंडेशनतर्फे सर्वधर्मीय ईद मिलन कार्यक्रम उत्साहात झाला. शहरातील विविध समाजातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे नेते सावकर मादनाईक, अमरसिंह निकम, जयसिंगपूर शहर मुस्लिम समाज मुतवल्ली हाजी शिकंदर गैबान, माजी नगरसेवक राहुल बंडगर, दादा पाटील चिंचवाडकर, प्रकाश निटवे, रमेश इंगळे, राजेंद्र नांद्रेकर, दस्तगीर नंदगावे, आफताब अतार आदी उपस्थित होते. संयोजन शकील गैबान, रुस्तमभाई मुजावर, शफी मुजावर, राजू सनदी, मेहबूब मुजावर, झहूर गैबान, तौसीफ गैबान, वासीम भटारी, सोहेल मुजावर, साहिल मुजावर आदींनी केले. स्वागत खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष रुस्तमभाई मुजावर यांनी केले.