Source: Sakal Kolhapur
03185नामदेव कुंभार 03184तुकाराम पाटील
जयभवानी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी नामदेव कुंभारमाजगाव : पडळ (ता. पन्हाळा) येथील जय भवानी विकास सेवा संस्थेची २०२३ ते २०२७ ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. संस्थेच्या अध्यक्षपदी नामदेव सदाशिव कुंभार यांची, तर उपाध्यक्षपदी तुकाराम आनंदा पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पन्हाळा उपनिबंधक कार्यालयातील मिलिंद पाटील यांनी काम पाहिले. या वेळी नुतन संचालक काशिनाथ कुंभार, विलास पाटील, प्रा. महादेव पोवार, प्रा. सुहास राऊत, तानाजी पाटील, आनंदा सुतार, बाळू वळके आदी उपस्थित होते. सचिव विश्वास बोरगे यांनी आभार मानले.