Source: Sakal Kolhapur
03458चंदूर ः येथील चंदूर ते रुई डांबरीकरण कामाचा प्रारंभ आमदार प्रकाश आवाडे यांनी केला. डॉ. राहुल आवाडे, महेश पाटील, स्नेहल कांबळे आदी उपस्थित होते.—–चंदूर-रुई रस्ता डांबरीकरणाचा प्रारंभकबनूर ः चंदूर, रुई गावांच्या विकास कामासाठी प्रयत्न करेन, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले. चंदूर (ता. हातकणंगले) येथील साडेतीन कोटींच्या चंदूर ते रुई रस्ता डांबरीकरण मजबुतीकरणाचा प्रारंभ आमदार आवाडे, जिल्हा परिषद माजी सदस्य डॉ. राहुल आवाडे, पंचायत समिती माजी सभापती महेश पाटील यांच्याहस्ते केला. यावेळी ते बोलत होते. डॉ. राहुल आवाडे, अभय काश्मिरे, सुभाष चौगुले, महेश पाटील यांची भाषणे झाली. ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दतवाडे, पंचगंगा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष कुमार खुळ, चंदूरचे उपसरपंच संजय जिंदे, ग्रामविकास अधिकारी बी. व्ही. कांबळे आदी उपस्थित होते. चंदूरच्या सरपंच स्नेहल कांबळे यांनी स्वागत केले. वडगाव बाजार समिती उपसभापती जगोंडा पाटील यांनी प्रास्ताविक केले. संदीप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.स्वाती कदम यांनी आभार मानले.