Source: Sakal Kolhapur
05318कागल : ”सौजन्याची वारी आली आपल्या दारी” अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ————घोडावत विद्यापीठातर्फे कागलमध्ये शालेय साहित्य वाटपजयसिंगपूर, ता. ३ : अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापीठाचा सामाजिक उपक्रम ”सौजन्याची वारी आली आपल्या दारी” अंतर्गत धरणग्रस्त वसाहत कागल येथील स्वामी समर्थ विद्या मंदिर येथे शालेय साहित्याचे वाटप केले. कागल तालुका कला, क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक मंडळाचे संचालक अमेय जोशी उपस्थित होते. उपक्रमाचे समन्वय प्रा. कोंगे यांनी या उपक्रमाच्या हेतू, उद्देशाबद्दल माहिती दिली. श्री. जोशी यांनी घोडावत विद्यापीठाच्या उपक्रमाचे स्वागत करून शाळेच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे आभार मानले. कार्यक्रमास दूधगंगा विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. डी. बुगडे, सहाय्यक शिक्षक आर. डी. माने, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. विद्यापीठाचे आशिष कुलकर्णी, डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंगचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राजकुमार माने केले. मुख्याध्यापिका संगीता पाटील यांनी आभार मानले.