Source: Sakal Kolhapur
इचलकरंजी महापालिका वापरणे————घरफाळा, पाणीपट्टी बिले संकेतस्थळावरमिळकतधारकांना सवलतीचा लाभ घेता येणार; भरणा करण्यासाठी विविध पर्यायइचलकरंजी, ता. ४ ः महापालिकेने नविन वर्षातील घरफाळा व पाणीपट्टीची बिले संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहेत. महिनाअखेर थेट मिळकतधारकांच्या हातात ही बिले पडणार आहेत. मुदतीत बिले भरणाऱ्या मिळकतधारकांसाठी महापालिकेकडून यंदाही सवलत जाहीर केली आहे. घरफाळा भरताना सुलभता येण्यासाठी मिळकतधारकांना विविध पर्याय उपलब्ध केले आहेत. नजिकच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्येही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.महापालिका झाल्यानंतर गेल्यावर्षी उच्चांकी घरफाळा वसुल झाला होता. तुलनेने पाणीपट्टी वसुली कमी झाली होती. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीसाठी वेगळ्या उपाययोजना प्रशासनाकडून सुरु केल्या आहेत. यापूर्वी नगरपालिका प्रशासन कार्यरत असताना घरफाळ्याची बिले वेळेत मिळकतधारकांना मिळत नव्हती. त्यामुळे सवलतीचा लाभ घेता येत नव्हता. मिळकतधारक व कर्मचारी यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण होत होते. महापालिका झाल्यानंतर पहिल्याच वर्षी या प्रक्रीयेत बदल करण्यास सुरुवात केली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. काही वर्षाच्या तुलनेने चांगली वसुली झाली आहे. यंदाही या प्रक्रियेमध्ये अधिक सुलभता आणली आहे. महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाकडून आतापासून संकेतस्थळावर घरफाळा व पाणीपट्टी बिले उपलब्ध करुन दिली आहेत. मिळकतधारकांना संबंधित संकेतस्थळावर जावून पाणीपट्टी व घरफाळा बिले डाऊनलोड करता येणार आहेत. तसेच अॅपच्या माध्यमातूनही ऑनलाईन घरफाळा व पाणीपट्टी भरता येणार आहे. ही सुविधा महापालिका प्रशासनाकडून उपलब्ध केली आहे. या शिवाय जूनी नगरपालिका इमारत, सरस्वती हायस्कूलनजिकचे बाळासाहेब माने सांस्कृतीक कार्यालय, विठ्ठल रामजी शिंदे शाळा, शहापूर अशा चार क्षेत्रीय कार्यालयातही भरणा करता येणार आहे. याबाबतची माहिती प्रभारी उपायुक्त केतन गुजर यांनी दिली.————घरफाळा सवलत/सुट दृष्टीक्षेपजुलै अखेर – ६ टक्केऑगष्ट अखेर – ४ टक्केसप्टेंबर अखेर – २ टक्के(ही सवलत/सुट संयुक्त करात आहे.)————(ही चौकट जरा ठळक वापरावी)
नविन पाच टक्के कराचे ओझेमहापालिका झाल्यामुळे मिळकतधारकांच्या मानगुटीवर आता तीन प्रकारच्या नव्या करांचे ओझे पडणार आहे. यामध्ये मलःनिस्सारण कर दोन टक्के, जललाभ कर २ टक्के व पथकर १ टक्के अशा ५ टक्के जादा कराची आकारणी यावर्षीपासून सुरु केली आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा जादा घरफाळा बिले मिळकतधारकांच्या हातात पडणार आहेत. महापालिका अधिनियमानुसार ही आकारणी करावीच लागते, असे प्रशासनाकडून सांगितले. त्यामुळे विविध सेवांच्या दरवाढीबरोबरच या नव्या करांचा बोजा मिळकतधारकांवर पडणार आहे.