Source: Sakal Kolhapur
ग्रामविकास अधिकारी कुंभार यांच्याकार्यपद्धतीवर रेंदाळ सभेत चर्चाहुपरी, ता. ३ : रेंदाळ येथील ग्रामविकास अधिकारी बी. टी. कुंभार यांच्या कार्यपद्धतीवरून ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत जोरदार चर्चा झाली. किरकोळ वाद वगळता सभा शांततेत झाली. अध्यक्षस्थानी सरपंच सुप्रिया पाटील होत्या.रेंदाळ ग्राम पंचायतीची मासिक सभा रविवारी (ता.३०) झाली. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, कर वाढीवर चर्चा करणे यासह इतर सहा विषय सभेपुढे होते. सरपंच सुप्रिया पाटील यांच्यासह विरोधी सदस्य दिग्विजय खानविलकर आदींनी अधिकारी कुंभार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. दोन गावचा कार्यभार सांभाळता, कार्यालयात उपस्थिती कमी असते, त्यामुळे गावचा विकास साधला जात नाही आदी कारणावरून अधिकारी कुंभार यांच्या बदलीची मागणी केली. यावेळी किरकोळ वादावादी होत जोरदार चर्चा झाली.सभेत सक्षम अधिकारी नियुक्तीसाठी पाठपुरावा करण्यासह अन्य विषयावरही चर्चा झाली. उपसरपंच अभिषेक पाटील, सदस्य उषाताई चौगुले, महेश कोरवी आदींसह सदस्यांनी चर्चेत भाग घेतला.””””””””””नवनिर्वाचित सदस्यांना अधिकाऱ्यांकडून योग्य ती माहिती मिळत नाही. सभेचे इतिवृत्त वेळेत पूर्ण केले जात नाही. त्यावर मासिक सभेत चर्चा झाली. गावासाठी पूर्णवेळ ग्राम विकास अधिकारी मिळावा अशी आमची मागणी आहे.-सुप्रिया पाटील, सरपंच रेंदाळ””””””””माझ्याकडे रेंदाळबरोबरच पट्टणकोडोली ग्राम पंचायतीचा कार्यभार आहे. दोन्हीकडील कामकाज पाहताना थोडी कसरत होते. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे लोकप्रतिनिधी, प्रशासन व ग्रामस्थ यांच्याशी समन्वय साधत काम करण्याचा आपला प्रयत्न असतो. बदलीच्या मागणीत तथ्य नाही.-बी. टी. कुंभार, ग्राम विकास अधिकारी, रेंदाळ