गेट 2023 परीक्षा विविध पदवीधारकांना सुवर्णसंधी

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

‘गेट’साठी अर्जाची मुदत महिनाअखेरकरिअरच्या विविध संधी; विविध शाखांतील पदवीधर ठरणार परीक्षेस पात्रप्रवीण जाधव ः सकाळ वृत्तसेवागांधीनगर, ता. २२ ः राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी पदवीधर अभियोग्यता चाचणी (गेट) परीक्षा अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, आर्किटेक्चर, विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील पदवीधारकांना सुवर्णसंधी आहे. परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत ३० सप्टेंबरअखेर असून परीक्षेच्या माध्यमातून करिअरच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत.अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणी (गेट) ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे जी प्रामुख्याने अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, आर्किटेक्चर, विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेमधील विविध पदवीपूर्व विषयांच्या सर्वसमावेशक आकलनाची चाचणी करते. गेट २०२३ ही संगणकाधारित चाचणी (सीबीटी) असेल जी भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी कानपूरद्वारे आयोजित केली जात आहे. ही परीक्षा आयआयएससी बंगळूर आणि (आयआयटी मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, मद्रास, रुरकी) या सात आणि उच्च शिक्षण विभाग यांच्याद्वारे संयुक्तपणे घेतली जाणार आहे.विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तसेच आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी परीक्षेमध्ये मिळविलेल्या गुणांचा वापर केला जाऊ शकतो. गुणांच्या आधारे अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, आर्किटेक्चर, विज्ञान, वाणिज्य, कला या शाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि थेट डॉक्टरेट अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो. कला आणि विज्ञानाच्या संबंधित शाखांमध्ये आणि इतर सरकारी संस्थांमध्ये डॉक्टरेटसाठी प्रवेश मिळू शकतो. काही महाविद्यालये आणि संस्थांमध्ये या गुणांच्या आधारे शिष्यवृत्ती मिळू शकते. सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील अनेक उपक्रमांमधील भरतीसाठी हे गुण वापरले जाऊ शकता.

फेब्रुवारीत परीक्षाकोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात शिकणारे किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी परीक्षेस पात्र आहेत. अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली असून ३० सप्टेंबर नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. वाढीव शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत ७ ऑक्टोबर आहे. ही परीक्षा ४, ५, ११ आणि १२ फेब्रुवारी २०२३ ला होणार आहे. परीक्षेचा निकाल १६ मार्च २०२३ ला घोषित होणार आहे. परीक्षेचे गुण हे निकाल लागल्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. या परीक्षेच्या आणखी माहितीसाठी https://gate.iitk.ac.in या लिंकवर जाऊन माहिती घेऊ शकता.

eZy News
LATEST
>>कोल्हापूरचा विकास जयपूरसारखा करू; केसरकर>>गुंडाचा डोक्यात दगड घालून खून>>आजरा येथे जुगार आड्यावर छापा.>>झुलन गोस्वामीची अखेरची लढत>>Lumpy skin disease : लम्पी स्कीनप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका>>कागल : राष्ट्रवादी पक्षाची विजयाची नांदी – आमदार हसन मुश्रीफ>>चंदगडी हिसका दाखवू>>शिराळा : विश्वास कारखाना वार्षिक सभा>>राक्षीतील घरफोड्याला अटक; वाघबीळ घाटात कारवाई, घरफोडीतील सोन्या-चांंदीचे दागिने जप्त>>शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही – मंत्री केसरकर>>गांधी समजून घेताना>>कोल्हापूरला जयपूर करू -नुतन पालकमंत्री दीपक केसरकर>>म.ह. शिंदे महाविद्यालय>>जातिविहीन व्हा, उच्चनिचतेच्या भिंती जमीनदोस्त करा”>>अन्नपुर्णा’ शुगरचा सोमवारी द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ>>‘सीबीआय’ कडून कागलमधील तरुणाची चौकशी>>लम्पी>>लव्हटे परिसंवाद>>कोजिमाशिची आज वार्षिक सभा>>नवरात्रोत्सव
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: