Source: Sakal Kolhapur
राज्य गुणवंत कामगारांचे सोमवारी अधिवेशन कोल्हापूर ः राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राज्य अधिवेशन सोमवारी (ता. ८) येथील शाहू स्मारक भवनात सकाळी दहा वाजता होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिवेशन होत आहे. यात गुणवंत कामगारांचा गौरव व कामगाराच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी दिली. या अधिवेशनास कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार ऋतुराज पाटील, कामगार महासंघाचे दिलीप जगताप, प्रधान सचिव विनिता सिंघल, कामगार कल्याण आयुक्त समाधान भोसले, विशाल घोडके आदी उपस्थित राहणार आहेत. राज्य शासनाने निवडलेले राज्यभरातील पाचशेवर गुणवंत कामगार व असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित राहतील. या अधिवेशनात सर्व गुणवंत कामगारांना प्रमाणपत्रे, गौरवचिन्ह, गौरवपत्र व फेटा देऊन सन्मान करण्यात येणार आहे. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी महादेव चक्के, भगवान माने, शिवाजी चौगुले, संभाजी थोरात आदी परिश्रम घेत आहेत.