Source: Sakal Kolhapur
गुणवंत कामगारांचा गडहिंग्लजला गौरवगडहिंग्लज : आर्किटेक्ट अॅन्ड इंजिनिअर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे बांधकाम क्षेत्रातील गुणवंत कामगारांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला. असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णात घोरपडे अध्यक्षस्थानी होते. जे. बी. बारदेस्कर, फिलोन बारदेस्कर, अॅड. पी. एल. गावडे प्रमुख पाहुणे होते. कामगारांना बांधकाम कामगार कल्याण योजनेबाबतची माहिती दिली. उपाध्यक्ष अजित उत्तूरकर, संदीप पाटील, सचिव राजेंद्र पाटील, खजिनदार राजेंद्र देशमाने, आण्णासाहेब गळतगे, अशोक देशपांडे, रमेश गायकवाड, संजय नाईक, दयानंद गुरव, शैलेंद्र कावणेकर, अशोक रोटे, सिंधू कावणेकर, राजेंद्र देसाई आदी उपस्थित होते.